तुम्ही जास्त बोलता, संयम नाही ठेवला तर राजकारण संपते !

पंतप्रधान मोदींच्या पंकजा मुंढे यांना कानपिचक्या ?

टीम : ईगल आय मीडिया

सध्या अनेकांना मंत्री बनण्याची घाई झाली आहे. परंतु आत्ता लोकसेवा करण्याची वेळ आहे. मंत्रीपद मागण्याची नाही, राजकारणात संयम नाही ठेवला तर कितीही मोठा नेता असो, त्याचे राजकारण संपुष्टात येते, अशा कानपिचक्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलवलेल्या राष्ट्रीय सचिवांच्या बैठकीत भाजप नेत्यांना दिल्या. त्यांचा रोख पंकजा मुंढे यांच्याकडे असल्याची चर्चा सुरू आहे.

”राजकारणात संयम ठेवला नाही, तर कितीही मोठा नेता असला तरी त्याचं राजकारण संपुष्टात येतं, शंकरसिंग वाघेला, दुसरे मदनलाल खुराणा आणि कल्याण सिंग हे तिघेही राजकीय आखाड्यात कसलेले होते, दूरदृष्टी होती, लोकनेते होते. परंतु फक्त संयम सुटला त्यामुळे तिघांचंही राजकारण संपल्याचं मोदी म्हणाले. मंत्रीपदाला नव्हे तर लोकसेवेला प्राधान्य द्या, असा कानमंत्रही मोदींनी दिला.


प्रीतम मुंडे यांना केंद्रात स्थान मिळालं नसल्यामुळे पंकजा आणि प्रीतम मुुंढे या नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. दरम्यान भाजपच्या ११ राष्ट्रीय सचिवांची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अध्यक्ष जे पी नड्डा, बी. एल. संतोष, पंकजा मुंडे, विनोद तावडे, विजया रहाटकर, सुनिल देवधर उपस्थित होते.


बीड जिल्ह्यात मुस्लिम व्यक्तीनं गोशाळा बांधली आहे. त्यांना केंद्र सरकारनं पद्मश्री दिलाय. या पद्मश्रींना जाऊन तुम्ही भेटला आहात का, असा सवालही मोदींनी पंकजा मुंडे यांना केेला.त्यावर पंकजा मुंडे काहीच बोलल्या नाहीत. त्यावर लोकांशी नाळ तोडू नका, असा सल्लाही मोदींनी दिला.

यावेळी सचिवांचा ‘सोशल मीडिया रिपोर्ट’ पंतप्रधान नरेंद्र मोदी घेऊन बसले होते. एकूण २५ राष्ट्रीय मुद्दे निवडण्यात आले होते. त्यावर कोणकोणते नेते ट्विटर, फेसबूक, इन्स्टाग्रामवर व्यक्त झाले आहेत. याची पूर्ण माहिती मोदींकडे होती. पंकजा तुम्ही जास्त बोलता, ‘लोकल’ मुद्द्यावर पण खूप बोलता. पण राष्ट्रीय मुद्द्यावर तुम्ही बोलताना दिसत नाही. राष्ट्रीय मुद्द्यावर तुमचे ट्विट कमी आहेत. लोकल पेक्षा राष्ट्रीय मुद्द्याकडे जास्त लक्ष द्या,” असाही सल्ला मोदीनी दिला.

Leave a Reply

error: Content is protected !!