In coming सुरू आहे !

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या सहा माजी आमदारांचा प्रवेश

टीम : ईगल आय मीडिया

गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रचंड ओहोटी लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला आता पुन्हा भरती आली असून आजवर 5 माजी आमदारांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला असून लवकरच 6 वे माजी आमदार पक्षात प्रवेश करणार आहेत अशी चर्चा सुरू आहे.

vdo पहा आणि चॅनेल subscribe करा

लोकसभा निवडणुकीत धुळदान उडाल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून जाण्याची शर्यतच लागली होती. अनेक दिग्गजांनी राम राम ठोकल्याने पक्षाला भविष्य उरले नसल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र खा. शरद पवारांच्या करिष्म्यामुळे अनपेक्षितपणे विधानसभा निवडणुकीत पक्ष उसळी मारून वर आला. आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा अच्छे दिन आले आहेत असे दिसते. ओहोटी नंतर आता पक्षात प्रवेश करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नेते, जिल्हा, तालुका,गाव पातळीवर कार्यकर्ते उत्सुक असल्याचे दिसते. विशेषतः युवक वर्गात पुन्हा एकदा राष्ट्रवादी ची क्रेझ वाढत असल्याने मोठे नेते सुद्धा राष्ट्रवादीच्या उंबरठ्यावर उभा राहीले आहेत.

महाविकास आघाडीचे राज्य सरकार चांगलेच स्थिरावले असून राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये प्रभावी दिसते आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इन्कमिंग सुरू झाले असून अनेक विद्यमान आमदारसुद्धा पक्षात परतण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. राष्ट्रवादी च्या नेत्यांनी ‘ या चिमन्यांनो परत फिरा घराकडे आपल्या ‘ अशी साद पक्ष सोडून गेलेल्या या नेत्यांना घातली आहे. मात्र पक्षांतर बंदी कायद्यामुळे विद्यमान आमदारांना लगेचच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करता येत नाही.

तूर्तास माजी आमदारांना राष्ट्रवादी प्रवेशाची घाई झाल्याचे दिसून येते. त्यामुळे गेल्या काही महिन्यात 5 माजी आमदारांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. येत्या काही दिवसात कोल्हापूर जिल्ह्यातील जनसुराज्य पक्षाचे माजी आमदार राजीव आवळे हे राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारीत असून, तसे झाल्यास गेल्या दोन महिन्यांत राष्ट्रवादीत प्रवेश करणारे ते सहावे माजी आमदार ठरतील.

खान्देशातील ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. खडसे यांच्यासह नंदुरबार जिल्ह्यातील शहाद्याचे माजी आ. उदयसिंह पाडवी, अभ्युदय बँकेचे अध्यक्ष व माजी आ. सीताराम घनदाट, चिपळूणचे माजी आ. रमेश कदम यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.


खानापूर-आटपाडीचे माजी आमदार सदाशिव पाटील यांनी 4 महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आता कोल्हापूर जिल्ह्यातील माजी आमदार राजीव आवळे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्गावर असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. एकनाथ खडसे यांनीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे काम जोमाने करण्याचा संकल्प केल्यामुळे ते खान्देश, उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी मजबूत होईल असे मानले जात आहे.

राज्यात सध्या असलेले महाविकास आघाडी सरकार 5 वर्षे पूर्ण करेल असा दावा केला जात असला तरीही अंतर्विरोधामुळे हे सरकार पडलेच तर मध्यावधी निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस जुळवाजुळव करीत असल्याचे मानले जात आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!