मरवड्यात राष्ट्रवादी चे सरपंच भाजपच्या प्रचारात

नेता इकडे आणि सरपंच तिकडे : असं कसं काय हो ?

मंगळवेढा : ईगल आय मीडिया

मरवडे ( ता.मंगळवेढा ) येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते लतीफ तांबोळी यांच्या गटाचे सरपंच भाजप उमेदवाराचा प्रचार करीत आहेत. हे पाहिल्या नंतर नेते इकडे आणि सरपंच तिकडे असं कसं काय ? असा सवाल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक सेलचे राज्य उपाध्यक्ष लतीफ तांबोळी यांनी स्वतंत्र आघाडी करत मरवडे येथे ग्रामपंचायत निवडणूक लढवली होती. या ठिकाणी लतीफ तांबोळी यांच्या पॅनलचा विजय झाला असून त्यांच्या गटाचा सरपंच ही झाला आहे.

सध्या सुरू असलेल्या पोटनिवडणूकीत हे सरपंच मात्र भाजपच्या गोटात डेरेदाखल झाले आहेत आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या व्यासपीठावर हजेरी लावत मरवडे गावात भाजपला प्रचंड बहुमत द्या असे आवाहनही केले आहे. यामुळे लतीफ तांबोळी यांनी निर्माण केलेल्या या आघाडीच्या सदस्यांना कुणाचे मार्गदर्शन होत आहे या गावात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा हस्ते निवडून आलेल्या पदाधिकार्‍यांचा सत्कार केला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मरवडे येथे सत्तांतर करण्यात आले आहे व या ठिकाणी आघाडीच्या माध्यमातून मरवडे गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे लतीफ तांबोळी यांनी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना सांगितले होते. मात्र गावातील आघाडीचे सरपंच भारतीय जनता पक्ष सोबत गेले असल्याने तालुक्यातून उलट – सुलट चर्चा सुरु झाली आहे.


मरवडे येथे भारत भालके गटाचे काम करणारे अनेक कार्यकर्ते आहेत, यातून सर्वांचा समन्वय न झाल्यामुळे भालके समर्थकांची आघाडी विरुद्ध लतीफ तांबोळी यांची आघाडी अशी निवडणूक होऊन या निवडणुकीमध्ये लतीफ तांबोळी यांच्या आघाडीने वर्चस्व प्रस्थापित केले.

मात्र एकीकडे राज्यस्तरीय राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता म्हणून सर्वत्र काम बघत असताना आपल्या गावात आपल्या आघाडीतील सरपंच हे विरोधकांची हातमिळवणी करून काम करत असताना तांबोळी हे कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

अशा प्रकारच्या ताज्या आणि विशेष बातम्यांसाठी खालील लिंकवरून आमच्या व्हाट्सएपच्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा!

https://chat.whatsapp.com/IcMfmYWcFIs7jgNSzE3k28

Leave a Reply

error: Content is protected !!