पक्ष देईल त्याचा प्रचार करावा लागेल

आ.परिचारक यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

पंढरपूर : ईगल आय मीडिया

भारतीय जनता पक्षाकडे आपणही उमेदवारीची मागणी केली आहे. मात्र पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याचा प्रचार करावा लागेल असे आवाहन आम.प्रशांत परिचारक यांनी केले आहे. आज पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित 22 गावातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

हे वृत्त पण वाचा

तुमच्या गावात मागील निवडणुकीत काय झालं ?

यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी पोटनिवडणूक आपण लढवली पाहिजे अशी मागणी केली. त्यावर आ.परिचारक यांनी मागील 2 निवडणुकीत संबंधित1कार्यकर्त्यांच्या गावात परिचारक यांना किती मते पडली आणि विरोधी मतदारांस किती मते मिळाली याची आकडेवारी सांगितली, आणि तुमचं तुमच्या गावात ऐकलं जात नसेल तर हरण्यासाठी निवडणूक का लढायची ? असा सवाल केला. तसेच अगोदर भालके गट आपला विरोधक आहे, त्याला हरवू आणि पुढील निवडणुकीत लढू असे सुनावले.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक संदर्भात आ. परिचारक यांनी मतदारसंघातील 22 गावातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. यावेळी वाखरी,गाडेगाव,कौठली, कासेगाव, अनवली, गोपाळपूर, तावशी, मुंधेवाडी, खर्डी, बोहळी, आदी 22 गावातील कार्यकर्त्यांनी यावेळी आपणच उमेदवारी घ्यावी आणि निवडणूक लढवावी अशी आग्रही मागणी केली.

हे वाचलं का ?

यावेळी परिचारक यांनी,गेल्या 2 विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतविभागणीमुळे विरोधक विजयी झाले आहेत, मतविभागणी टाळण्यासाठी एकच उमेदवार देणे गरजेचे आहे, आपणही पक्षाकडे मागणी केलेली आहे, मात्र पक्ष जो उमेदवार देईल त्याला निवडून आणावे लागेल असे आवाहन केले.

आ. परिचारक यांच्या या भूमिकेवरून पोटनिवडणूकीत परिचारक गटाचा उमेदवार नसणार हे जवळपास निश्चित झाले आहे. भाजपची उमेदवारी दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान अवताडे यांना मिळणार असल्याचे मानले जाऊ लागले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!