पंढरपूर नगरपालिका निवणुकीत मनसे ठरणार निर्णायक

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली असून बलाढ्य परिचारक गटासमोर सर्व पक्षीय आघाडीचे आव्हान उभा केले जाण्याची शक्यता आहे. या आघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना महत्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गेल्या दोन वर्षात विशेषतः कोरोना काळात मनसेने सर्व सामान्य पंढरपूरकराना सर्व तर्हेने मदतीचा हात देऊन सामान्य लोकांची मोठी सहानुभूती मिळवली आहे. त्याच बरोबर मनसे चे नेते दिलीप धोत्रे यांनी सर्व पक्षीय आघाडी उभा करण्यासाठी मागील काही दिवसांपासून प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे परिचारक यांच्या आघाडीसमोर एकसंघ विरोधक उभा करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

पंढरपूर नगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. येत्या काही दिवसांत प्रभाग रचना पूर्ण होऊन निवडणूक प्रक्रिया पुढील टप्प्यात जाईल. इकडे राजकीय आघाडीवर सत्ताधारी परिचारक गटाने मे महिन्यात विधानसभा पोटनिवडणुक जिंकताच सुरुवात केली आहे. तर विरोधी आघाडीवर अद्यापही विस्कळीतपणा आहे. सर्व विरोधक विविध पक्षात आणि गटात विभागले आहेत. त्यामुळे परिचारक यांच्या बलाढ्य आघाडीसमोर सर्वपक्षीय आघाडी उभा करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

सर्वांना एकत्र करून परिचारकांची सत्ता घालवणार !

दिलीप धोत्रे गेल्या अनेक वर्षांपासून नगरपालिकेत सत्तेत असलेल्या आणि नागरिकांना किमान मूलभूत सुविधा ही देऊ न शकलेल्या सत्ताधारी परीचारकांच्या आघाडीसमोर सर्व पक्षीय एकसंघ आघाडी उभा करून कोणत्याही परिस्थितीत परिचारकांची सत्ता घालवणार आहोत.

श्री. दिलीप धोत्रे, नेते, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांनी गेल्या 2 महिन्यापासून प्रयत्न सुरू केले आहेत. 2019ची विधानसभा आणि एप्रिल 2021 ची विधानसभा पोटनिवडणूकित ही दिलीप धोत्रे यांनी मनसेच्या ताकदीचे दान राष्ट्रवादी च्या पारड्यात टाकले होते. आगामी निवडणुकीतही जरी भाजप मनसे आघाडी झाली तरीही स्थानिक पातळीवर मनसे सर्वपक्षीय आघाडी करून निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहेत. सध्या पंढरपूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मोठी असली तरीही मोठ्या प्रमाणात गट तट आहेत. काँग्रेस, शिवसेना आणि मनसे यांची संयुक्त आघाडी उभा केल्यास एक मोठी आघाडी परिचारक यांच्या समोर उभा राहण्याची शक्यता आहेत.

पंढरपूर शहरात गेल्या साडेसात वर्षांपासून परिचारक गटाची सत्ता आहे. आणि सर्वच आघाडीवर सत्ताधाऱ्याविरोधात नाराजी आहे. विशेष म्हणजे परिचारक गटातही ‘बाहुबली’ नेत्यांमध्ये सत्तेच्या ‘लाभांश’वाटपावरून मोठी धुसफूस आहेच.

ती धुसफूस कॅश करून सर्व विरोधी पक्षांना एकसंघ करून परिचारक यांच्या सत्तेला आव्हान देण्याचा निर्धार मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केला आहे. सगळे विरोधक एकत्र करणार असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला आहे. एक समान मूलभूत कार्यक्रम ठरवून ज्याच्या-त्याच्या ताकदीनुसार जागा वाटप करून निवडणुकीत परिचारक यांच्या सत्तेला आव्हान देण्याची तयारी धोत्रे यांनी सुरू केली आहे.

गेल्या 2 वर्षांपासून दिलीप धोत्रे आणि मनसेने कोरोना महामारीच्या काळात हजारो कुटुंबांना, सर्व समाजातील घटकांना जीवनावश्यक वस्तूपासून ते औषधोपचार आणि हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून देण्यापर्यंत मदत केली आहे. रिक्षावाला ते धुणी भांडी करणाऱ्या पासून आणि तृतीय पंथिय ते सर्वच समाज घटकांना संकट काळात मोठी मदत केली आहे. त्यामुळे सामान्य पंढरपूरकराना संकटात मोठा आधार दिलेल्या मनसे बाबत सहानुभूती वाटत आहे.

त्याच बरोबर राजकीय आघाडीवर दिलीप धोत्रे यांनी बेरजेचे राजकारण अंगिकारले असल्याने त्यांची भूमिका सर्वसमावेशक ठरली आहे. याचा परिणाम म्हणून परिचारक यांच्या एकहाती सत्तेसमोर सर्वपक्षीय आघाडीचे आव्हान उभा केले जाऊ शकते.

Leave a Reply

error: Content is protected !!