पंढरपूर तालुक्यावर कोरोनाचा वर्मी वार
पंढरपूर : ईगल आय मीडिया
जेष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनामुळे पंढरपूर तालुका सुन्न झाला आहे. एकाच आठवड्यात राजूबापू पाटील आणि सुधाकरपंत परिचारक यांच्यासारखे दोन मोठे नेते गमावल्याने पंढरपूर तालुक्यातील सर्व सामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. घरो घरी दुःख आणि हळहळ व्यक्त होत आहे.
पंढरपूर तालुक्याला कोरोनाचा विषारी विळखा पडला असून 1800 पेक्षा जास्त लोकांना घेरले आहे. शहराच्या प्रत्येक गल्ली बोळात कोरोनाने शिरकाव केला असून ग्रामीण भागातही अर्ध्याहून अधिक तालुका कोरोनाने व्यापला आहे. त्यामुळे नागरिक अगोदरच हवालदिल झालेले आहेत. यातच तालुक्यातील मोठ्या नेत्यांची घरे आणि खुद्द नेतेच कोरोनाचे बळी ठरल्याने पंढरपूर तालुका हादरून गेला आहे.
दुर्दैवी योगायोग !
दोघेही एकाच राजकीय पंथाचे वाटसरू
जेष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक आणि दिवंगत नेते यशवंतभाऊ पाटील यांचे अनेक वर्षांचे राजकीय सख्य होते. यशवन्त भाऊ हे शरद पवार गटाचे आणि मालक वसंतदादा गटाचे एवढा बारीकसा भेद सोडला तर दोन्हीही नेते एकाचवेळी काँग्रेस पक्षात काम करीत होते.
दोघेही एकाचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही गेले होते. परिचारक गटासोबत असतानाच राजूबापू पाटील यांना जिल्हा परिषदेच्या कृषी व पशु संवर्धन समितीचे सभापती पद मिळाले होते. मागील 15 वर्षात या दोन्ही गटांच्या वाटा वेगळ्या असल्या तरीही राजकीय मतभिन्नता जाहीरपणे कधीच दाखवली नाही. दोन्ही गट एकमेकांविषयी आदरभाव राखून होते. आणि दोन्ही गटाचे प्रमुख नेते एकाच आठवड्यात, एकाच आजाराचे बळी ठरले. आणि दोघेेही लोकनेते आहेत, तरीही अखेरच्या विसाव्यासाठी त्यांना आपल्या माणसांमध्ये जाता आले नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रांतिक सदस्य राजूबापू उर्फ पांडुरंग पाटील यांच्या घरातील सर्व सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातच बापूंचे चुलते, लहान भाऊ यांचे निधन झाले आणि 13 ऑगस्ट रोजी राजूबापू पाटील यांच्या निधनाची धक्कादायक बातमी आली. त्या धक्क्यातून आणखीनही पंढरपूर तालुका सावरलेला नाही. गावो गावी दुःख, हळहळ व्यक्त होत आहे. तेवढ्यात परिचारक कुटुंब कोरोनाच्या विळख्यात अडकल्याचे वृत्त आले. परिचारक यांच्या कुटुंबातील 7 सदस्यांना कोरोना झाला असून इतर सदस्यांची तब्येत सुधारलेली असताना राजकारणातील संत मानले गेलेल्या सुधाकरपंत परिचारक यांचे कोरोनाने निधन झाले. हा धक्का तालुक्यातील आबालवृद्ध नागरिकांना असह्य धक्का आहे. संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. अकल्पित अशा दुःखद घटना घडत आहेत, आणखीन पुढे काय वाढून ठेवले आहे या भीतीने तालुक्यातील सामान्य नागरिक हादरून गेला आहे. मोठे नेते जर कोरोनाच्या विळख्यातून सुटू शकणार नसतील तर आपले काय ? अशी भीती नागरिकांच्या मनात बसली आहे. त्याचबरोबर तालुक्यातील मोठ्या नेत्यांना एकाच आठवड्यात गमावल्याने मोठा आघात झाल्याची भावना घराघरातून व्यक्त होत आहे.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
*भोसं आणि भोस्याच्या पंचक्रोशीच्या पांडुरंगानंतर आज पंढरीच्या पांडुरंगावर या महामारीन आघात केला..*
*तुम्हा-आम्हा मानवी कटपुतळ्याचं दुर्दैव हे की ही देवावतारी माणसं आयुष्यभर देवाच्या पायरीजवळ देव होऊन राहिली,त्यांचं आचरण साक्षात देवअवतारी होत,यांच्या निर्वातनानंतर स्वार्थी-मतलबी,माणसांचा हात नव्हे सावलीसुद्धा त्यांच्या पवित्र अशा देहावर पडू नये याची खबरदारी तर ईश्वराने घेतली नसेल..!!😢😢*
*भावपूर्ण आदरांजली..!!*
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐