पंढरपूर तालुक्यात मोठ्या पुढाऱ्यांची गावे खुली

कासेगाव, खर्डी, भाळवणी, सरकोली, वाडीकुरोलीत खुल्या वर्गासाठी सरपंच सोडत

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत आरक्षण सोडतीमध्ये मोठ्या नेत्यांची मोठी गावे सर्वसाधारण किंवा सर्व साधारण महिलेसाठी राखीव झाली आहेत. यामध्ये खर्डी, कासेगाव,भाळवणी, वाडी कुरोली, सरकोली, वाखरी अशा गावांचा समावेश आहे. येथील शासकीय गोदामात आज तालुक्यातील 94 गावच्या सरपंच आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. यावेळी तहसीलदार विवेक साळुंखे, नायब तहसीलदार तिटकारे, श्रोत्री, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके आदी सह अनेक गावचे प्रमुख उपस्थित होते.

तालुक्यातील 94 गावचे सरपंच सोडत आरक्षण वरीलप्रमाणे आहे.

अनुसूचित जमाती साठी रोपळे, शेगाव दुमाला आणि तारापूर ही तीन गावे आरक्षित झाली आहेत. या तिन्ही जागी महिलांना आरक्षण मिळाले आहे.

लोकसंख्या निकष ठरवून तालुक्यातील गावे आरक्षण निश्चित करण्यात आले.

यामध्ये 3 गावे अनुसूचित जमाती साठी राखीव झाली आहेत.

तारापूर, रोपळे आणि शेगाव दुमाला या तीन गावचे सरपंच पद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव झाले आहे.

त्याचबरोबर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी

लोणारवाडी, शिरगाव, आढिव, चिंचोली भोसे, पोहोरगाव, खरातवाडी, ईश्वर वठार, गोपाळपूर, कोरटी , बोहाळी, उपरी, जाधववाडी, व्होळे

Obc महिला साठी : जैनवाडी, आजोती, पांढरेवाडी, तनाळी, केसकरवाडी, खेडभोसे, शेंडगेवाडी, गारडी, करकम्ब, पुळूज वाडी, टाकळी गुरसाळे, सुपली ही गावे राखीव झाली आहेत.

सर्व साधारण महिला साठी :

देवडे, एकलासपूर, रांझनी, सरकोली, शेळवे, शेटफळ, सिद्धेवाडी, कासेगाव, उंबरे, जळोली, पेहे, सुगावा खुर्द, कवठाली, देगाव, खर्डी, आंबे, ओझेवाडी, पटवर्धन कुरोली, उजनी वसाहत, पिराची कुरोली, शंकरगाव नळी, तुंगत, नेमतवाडी,

तर सर्व साधारणसाठी :

बाभूळगाव, भाळवणी, भोसे, बिटरगाव, चिलाईवाडी, धोंडेवाडी, करोळे, खेडभाळवणी, मुंढेवाडी, सांगवी बदलकोट, सुगाव भोसे, विटे, वाडीकुरोली, कान्हापुरी, गुरसाळे, वाखरी, टाकळी, अनवली, फुलचिंचोली, पुळूज, नांदोरे, तावशी, मगरवाडी ही गावे खुल्या वर्गासाठी आहेत.

अनुसूचित जाती साठी राखीव महिला. अजनसोंड, नारायण – चिंचोली, तिसंगी, कोंढारकी, सुस्ते, शेवते, शिरढोन, नेपतगाव, उंबरगाव, आव्हे-तरटगाव

अनु जाती पुरुष राखीव

खरसोळी, पळशी, भटुंबरे, चळे,मेंढपूर, आंबे चिंचोली, सोनके, बार्डी, गादेगाव,भंडीशेगाव ही गावे आहेत

Leave a Reply

error: Content is protected !!