हे आहेत देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री

पहिले पाच लोकप्रिय मुख्यमंत्री बिगर भाजप

टीम : ईगल आय मीडिया

देशातील आघाडीचे नियतकालिक इंडिया टुडे ने केलेल्या सर्व्हेक्षण मध्ये देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिल्या पाच क्रमांकावर बिगर भाजपचे मुख्यमंत्री आहेत. विशेष म्हणजे पहिल्या 11 मध्ये भाजपचे केवळ 2 मुख्यमंत्री सामील आहेत.

इंडिया टुडेने नुकत्याच केलेल्या सर्व्हेत देशातील 11 लोकप्रिय मुख्यमंत्र्यांची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या पाचमध्ये भाजपच्या एकाही मुख्यमंत्र्याचा समावेश नाही. 11 जणांच्या यादीत भाजपच्या केवळ दोनच मुख्यमंत्र्यांना स्थान मिळवता आले आहे. भाजपचा एकही लोकप्रिय मुख्यमंत्री या टॉप पाचमध्ये नाही.


देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या नावांच्या यादीत पहिले स्थान तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांना पसंती मिळाली आहे. दुसर्‍या क्रमांकावर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक, तिसरे स्थान केरळचे मुख्यमंत्री पिनराईन विजयन, चौथे स्थान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तर पाचवे स्थान पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांना मिळाले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देशातील पहिल्या पाच लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये समावेश झाला आहे. कोरोना महामारिमध्ये संयमाने राज्याचा चालवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये चौथे स्थान मिळाले आहे. तर एम के स्टॅलिन पहिल्या, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक दुसऱ्या, केरळचे पी विजयन तिसऱ्या स्थानी आहेत.

एमके स्टालिन यांना 42% रेटिंग आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या
नवीन पटनाईक यांना 38% तर 3 ऱ्या क्रमांकावरिल पिनाराई विजयन यांना 35% रेटिंग आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रातील 31% नागरिकांचा पाठिंबा आहे. त्यांच्या पाठोपाठ ममता बॅनर्जी आहेत ज्यांच्याकडे 30%चे रेटिंग रेटिंग आहे.


भाजपचे आसाममधील मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अकरा जणांच्या यादीत स्थान मिळाले आहे. मात्र, पहिल्या पाचमध्ये भाजपच्या एकाही मुख्यमंत्र्याचा समावेश नाही. योगी आदित्यनाथ यांना तर या सर्व्हेत केवळ 29 टक्के लोकांनी पसंती दिल्याचे इंडिया टुडेच्या मूड ऑफ द नेशन सर्व्हेत स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!