इंटरनेटवर पॉर्न शोधताय ? पकडले जाणार

अश्लील व्हीडिओ कोण पाहतेय ते पोलिसांना समजणार

टीम : ईगल आय मीडिया

इंटरनेटवरून पॉर्न व्हिडिओ पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे,कारण मोबाइलवर कोण – कोण पॉर्न व्हिडिओ पाहतोय हे पोलिसांना समजणार आहे. त्यासाठी १०९० ची एक टीमलक्ष ठेवणार आहे. अश्लिल फोटो आणि व्हिडिओ पाहणाऱ्यांना अगोदर सावध केले जाणार आहे. त्यामुळे यापुढे इंटरनेटवर पॉर्न पाहणं महागात पडू शकतं.

देशात इंटरनेटवर पॉर्न पाहण्याचे प्रमाण चिंताजनक झाले आहे. त्यामुळेच लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत आहेत आणि महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. समाजाचे नैतिक अध:पतन होऊ लागले आहे. हजारो पॉर्न वेबसाईटवर बंदी घालूनही हे स्तोम वाढतच आहे. यावर आता पॉर्न पाहणाऱ्यानाच आळा घालण्याचा प्रयत्न केला जात आहे.

एडीजी नीरा रावत यांनी सांगितले की, इंटरनेटच्या एनालिटिक्सला स्टडी करण्यासाठी oomuph नावाची एक कंपनी आहे. डेटाच्या माध्यमातून इंटरनेट वर काय सर्च केले जात आहे. यावर वॉच ठेवला जाणार आहे. जर एखादी व्यक्ती इंटरनेटवर अश्लील व्हिडिओ पाहत असेल तर त्याचे संकेत एनालिटिक्स टीमला मिळतील. टीम त्याच्यासंबंधी १०९० टीमला कळवणार आहे. त्या व्यक्तीला अलर्ट करण्यासाठी एक मेजेस पाठवला जाईल. असे करून गुन्ह्याच्या सुरुवातीला रोखता येऊ शकते.

यासंदर्भात १०९० च्या एका आयोजित कार्यक्रमात एडीजी नीरा रावत यांनी इंटरनेटवरील वाढत्या सर्च मोहीमेसंबंधी बोलताना ही माहिती दिली आहे. १०९० ने लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या माध्यमाचा प्रयोग करण्याचे ठरवले आहे. उत्तर प्रदेश मध्ये डिजिटल चक्रव्यूह (महिला सुरक्षेसाठी ३६० डिग्री इकोसिस्टम) साठी एक डिजिटल आउटरिच रोडमॅप तयार करण्यात आला आहे. यासोबत महिलांच्या सुरक्षेसाठी अलर्ट असलेले १०९० वेळोवेळी जागृत करण्याचे मेसेज सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर पाठवणार आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!