प्रा.राम शिंदेंच्या उमेदवारीचे काय झाले ?

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक भाजपची उमेदवारी कुणाला?

पंढरपूर : ईगल आय मीडिया

गेल्या दोन दिवसांपासून पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकित भाजपची उमेदवारी माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांना मिळणार असल्याची चर्चा निरर्थक ठरली असून भाजपच्या नेत्यांनी राम शिंदे यांना स्पष्ट नकार कळवला आहे.

ही बातमी पण वाचा !

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तरीही अद्याप भाजपचा उमेदवार निश्चित झालेला नाही. विधानपरिषद सदस्य आ. प्रशांत परिचारक आणि दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान अवताडे यांच्यापैकी एक उमेदवार निश्चित होणार असल्याची खात्रीपूर्वक बातमी आहे.

मात्र मागील दोन दिवसांपासून मतदारसंघातील जातीय समीकरणे लक्षात घेऊन माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. या मतदारसंघात धनगर समाजाचे मोठे मतदान असून त्या मतांवर डोळा ठेऊन भाजप प्रा. राम शिंदे यांना उमेदवारी देईल अशी चर्चा रंगली होती.

मात्र “मतदार संघात जरी धनगर समाज मोठा असला तरी मराठा विरुद्ध धनगर असा जातीय रंग निवडणुकीला देता येणार नाही, त्यामुळे उमेदवारी देता येत नाही”, अशा शब्दांत फडनवीस यांनी सांगितले असल्याचे खात्रीशीर सूत्रांकडून समजते.

भाजपच्याच सोलापूर येथील एका माजी मंत्र्यांच्या डोक्यात निर्माण झालेलं हे खूळ अखेर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उतरवले आहे. त्यांनीच प्रा.राम शिंदे यांना स्पष्ट शब्दात ‘उमेदवारी नाही’ असे सांगितले आहे. यावरून मागील दोन दिवसांपासून सुरू असलेली राम शिंदे यांच्या उमेदवारीची चर्चा निरर्थक ठरली आहे, आणि त्यांच्या उमेदवारी चा पत्ता ही कट झालेला आहे असे दिसते.

Leave a Reply

error: Content is protected !!