पदवीधर आणि शिक्षक विधानपरिषद निवडणुकीत स्वेरी ठरणार निर्णायक ?

डॉ. बी पी रोंगे यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पुणे विभागीय शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत स्वेरी परिवार निर्णायक ठरणार असून निवडणूक रिंगणातील उमेदवारांनी स्वेरीचे प्रमुख डॉ. बी पी रोंगे यांच्याशी संपर्क साधून एक गठ्ठा मतदान मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत स्वेरी निर्णायक ठरणार असल्याचे मानले जात आहे.

पुणे विभागीय शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप या प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून उमेदवार प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत.

सोलापूर जिल्ह्यात स्वेरी परिवार हा शिक्षक आणि पदवीधर नाव नोंदणी, संपर्क असलेला मोठा परिवार आहे. स्वेरीचे संस्थापक डॉ.बी पी रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरी परिवाराने 6 हजारावर पदवीधरांची नाव नोंदणी केली आहे. तसेच स्वेरीच्या शिक्षण संकुलात 400 शिक्षक मतदार आहेत. स्वेरीच्या विविध अभ्यासक्रमातून पदवीधर होऊन गेलेले हजारो माजी विद्यार्थी आणि पदवीधर मतदार स्वेरीच्या प्रभावात आणि संपर्कात असतात. त्यामुळे स्वेरीची भूमिका हजारो पदवीधर आणि शेकडो शिक्षकांच्या मतदानावर परिणामकारक ठरणार आहे.

5 जिल्ह्याचे विस्तीर्ण कार्यक्षेत्र असल्यामुळे उमेदवारांना सर्व मतदारापर्यंत पोहोचणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे मोठ्या शैक्षणिक संस्था, शिक्षक संघटना, पदवीधर संघटना आणि पदवीधर नाव नोंदणी करून घेतलेल्या स्वयंसेवकांकडे उमेदवारांचा राबता वाढला आहे. कमी वेळ असल्याने एक गठ्ठा मतदान कसे मिळेल याकडे उमेदवारांचे आणि राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. त्यामुळेच शिक्षक, पदविधरांचे मेळावे, बैठका घेण्यात येत आहेत. कोरोना मुळे मेळावे आणि बैठकांना मर्यादा येत आहेत हे लक्षात घेता एक गठ्ठा मतदान असलेल्या संस्था, नेते, पदाधिकारी यांचे महत्व वाढले आहे.

या पार्श्वभूमीवर एकगठ्ठा मतदान असलेला स्वेरी परीवार या निवडणुकीत निर्णायक ठरणार असल्याचे मानले जात आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!