राजेंद्र पवार यांची पंतांच्या वाड्यावर ‘सदिच्छा’ भेट

त्याचवेळी मुलगा आ. रोहित पवार भगीरथ भालके यांच्या प्रचारात

टीम : ईगल आय मीडिया

आ.रोहित पवार भालकेंच्या प्रचारात तर वडील राजेंद्र पवार पंतांच्या वाड्यावर पंढरपूर : ईगल आय मीडिया। पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक प्रचार हातघाईला आलेला असताना राष्ट्रवादी काँग्रेस चे आम रोहित पवार आज पंढरीत उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारात होते तर त्यांचे वडील राजेंद्र पवार यांनी पंतांच्या वाड्यावर जाऊन सुधाकपंतांना अभिवादन केले आहे. आज दुपारनंतर पंढरीत या वेगळ्या भेटीची उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक ऐन रंगात आलेली आहे.राष्ट्रवादी चे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचाराला कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार आले आहेत. त्यांनी शहरात विविध भागात आज कोपरा सभा घेतल्या. त्याच दरम्यान त्यांचे वडील आणि बारामती ॲग्रोचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी पंढरपूर येथील सुधाकपंत परिचारक यांच्या वाड्यावर सदिच्छा भेट दिली.

यावेळी राजेंद्र पवार यांनी स्व. सुधाकपंतांना अभिवादन केले. तर युटोपीयन चे चेअरमन उमेश परिचारक व युवानेते प्रणव परिचारक यांनी त्यांचे स्वागत केले.

सध्या पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूकीची रणधुमाळी सुरू असताना राजेंद्रदादा पवार यांची परिचारक यांच्या वाड्यावरील भेटीकडे अनेकांचे लक्ष लागून राहिलेले आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत राजेंद्र पवार आणि उमेश परिचारक व प्रणव परिचारक यांच्यात काय चर्चा झाली, याकडे मंगळवेढा-पंढरपुर मतदारसंघाच्या मतदारांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

एकीकडे मुलगा पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करीत असताना वडील विरोधी उमेदवाराच्या निवडणूक प्रमुखाच्या घरी जातात याबाबत उलट सुलट चर्चा रंगली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!