पंढरपूर ची अनोखी खण राखी गेली राज्याच्या बाहेर

सोशल मिडियावरून केले यशस्वी मार्केटिंग

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर येथील युवतीने कल्पकतेने सांस्कृतिक मेळ घालून बनवलेल्या खण राखी ला राज्याच्या बाहेरून मोठी मागणी झाली आहे. जवळपास 400 हुन अधिक राख्या मुंबई, हैदराबाद, बेंगलोर, ठाणे,पुणे, कोल्हापूर या शहरात पाठवण्यात आलेल्या आहेत.

पंढरपूर येथील कु.पायल संतोष पवार या युवतीने राखी पौर्णिमेच्या निमित्ताने राखी डिझाइन करताना तिला चोळ खणाची जोड दिली. भारतीय पेहेरवात विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटकात खण पारंपरिक पोशाख म्हणून महिला वापरतात. या चोळ खणाचा मोठ्या खुबीने राखी बनवताना वापर केल्यामुळे ही राखी आकर्षक तर झालीच आहे,मात्र तिला पारंपरिकतेची जोड मिळाली आहे. त्यामुळे ही राखी मोठ्या प्रमाणात आकर्षण ठरली आहे.

पायल ने या राखीचे डिझाईन केल्यानंतर आपल्या पायल क्राफ्ट या फेसबुक पेज आणि यू ट्यूब चॅनेलवर तिची पोस्ट केली होती. त्यावरून दिल्ली,बेंगळुरू, हैद्राबाद, मुंबई,कोल्हापूर येथून राखीला मागणी आली.


कु.पायल चा हा पहिलाच प्रयत्न असल्याने मागणी एवढा पुरवठा करता आलेला नाही.तरीही आजवर 400 शे च्यावर खणराखी ची ऑर्डर पूर्ण केली आहे. कु.पायलच्या या अनोख्या प्रयोगाचे आणि तिने केलेल्या यशस्वी मार्केटिंग चे कौतुक होत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!