दिवंगत आ.भारत भालके गटाने पुन्हा एकदा मिळवली सत्ता
पंढरपूर : ईगल आय मीडिया
शिरढोण ( ता. पंढरपूर ) ग्रामपंचायती च्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी स्वर्गीय आमदार भालके गटाने 9 पैकी 5 जागांवर विजय मिळवला आहे. मुरब्बी आणि बलाढ्य विरोधक असतानाही युवकानी सत्तेचा गड काबीज केला आहे.
येथील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत आमदार परिचारक विरुद्ध स्वर्गीय आमदार भालके व काळे गट असा दुरंगी सामना रंगला होता. 3 प्रभागांमध्ये 9 जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. यामध्ये अतिशय चुरशीने झालेल्या निवडणुकीत आमदार परिचारक गटाला 4 जागा तर भालके काळे गटाला 5 जागांवर विजय मिळाला.
निवडून आलेल्या सत्ताधार्यांच्या प्रत्येक प्रभागा मधून अनुसूचित जाती दोन अनुसूचित जमाती एक नामाप्र एक व सर्वसाधारण महिला 1 अशा जात निहाय निवडून आलेल्या सदस्यांची संख्या आपल्या गटाकडे आहे. यामुळे सरपंच पद आरक्षण कोणतेही निघाले तरी सत्ता आम्हीच स्थापन करून हा विजय स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्या चरणी अर्पण करू, असा विश्वास श्री विठ्ठल सहकारी कारखान्याचे संचालक दत्तात्रय कांबळे व माजी सरपंच गणेश भुसनर यांनी व्यक्त केला आहे.
असल्याने सत्ता पुन्हा एकदा ताब्यात ठेवण्यात यश मिळाले आहे. नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करून श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सरपंच पदाच्या आरक्षणाची चिंता नाही
ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या मात्र सरपंच पदाचे आरक्षण सोडत अजून निघालेली नसल्यामुळे अनेक विजयी उमेदवारांची धाकधूक वाढली आहे, मात्र सर्व आरक्षित प्रवर्गातील सदस्य निवडून आल्याने इथे भालके गटाला आरक्षण सोडतीची कसलीच चिंता नाही.