माझी उमेदवारी जनतेचा आग्रह : सिद्धेश्वर आवताडे

सिद्धेश्वर अवताडे यांचा निवडणूक लढवण्याचा ठाम निर्धार

मंगळवेढा येथे झालेल्या कार्यकर्ता बैठकीत बोलताना सिद्धेश्वर अवताडे.

मंगळवेढा : ईगल आय मीडिया

माझी उमेदवारी हे मंगळवेढा तालुक्यातील जनतेचा आग्रह असून लोकशाही च्या माध्यमातून मी निवडणुकीला सामोरे जाणार आहे, मला कोणीही निवडणूक लढवू नये याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी वेळ वाया घालवू नये, असे आवाहन सिद्धेश्वर अवताडे यांनी केले.

मंगळवेढा तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर अवताडे यांनी पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकिसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे भाजपसह मंगळवेढा तालुक्यातील राजकारण ढवळून निघाले नाही. सिद्धेश्वर अवताडे खरेच निवडणूक लढवणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर काल ( शुक्रवारी ) विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सलग दुसऱ्या दिवशी बबनराव आवताडे यांची भेट घेतली.यावेळी त्यांनी सिद्धेश्वर आवताडे यांची मनधरणी करण्याच्या प्रयत्न केला मात्र यश मिळाले नाही.

माझी उमेदवारी हे मंगळवेढा तालुक्यातील जनतेचा आग्रह असून भविष्यात माझ्याकडून असलेल्या अपेक्षांच्या पूर्तीसाठी लोकशाही च्या माध्यमातून मी निवडणुकीला सामोरे जाणार आहे मला कोणीही निवडणूक लढवू नये याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी वेळ वाया घालवू नये, असे मत खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे यांनी व्यक्त केले.

शुक्रवारी दुपारी रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सिद्धेश्वर आवताडे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी अशी सूचना मांडली. यावर सिद्धेश्वर आवताडे यांनी कोणत्याही परिस्थितीत माघार घेतली जाणार नसून, माझ्यावर विश्वास असणाऱ्या तालुक्यातील अनेक सहकारी कार्यकर्ते व नागरिकांच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. जनतेच्या आग्रहातून माझी उमेदवारी पुढे आलेली आहे. मी निवडणूक लढवण्यास पूर्वी मतदारसंघातील सगळ्या भागात माझा विचार बोलून दाखवल्या नंतर मला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा व्यक्त झाला असल्याने या सर्व भावनांचा विचार करता, मला आता माघार घेता येणार नाही असे सांगितले नाही. यानंतर भारतीय जनता पक्षाकडून सिद्धेश्वर आवताडे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न संपुष्टात आल्याचे दिसत आहे.

सिद्धेश्वर आवताडे हे तालुका खरेदी-विक्री सहकारी संघाचे चेअरमन आहेत. सार्वजनिक शिवजयंती मंडळ तसेच विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग असल्याने युवकांत त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. पूर्णवेळ सामाजिक बांधिलकी म्हणून काम करणाऱ्या अवताडे यांचे ग्रामीण भागात नेटवर्क मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांच्या उमेदवारीचा फटका भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांना निश्चित बसू शकतो.

Leave a Reply

error: Content is protected !!