२४ तासांत २३ हजार ६४४ करोना रुग्ण बरे झाले
टीम : ईगल आय मीडिया
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले असून आजवर तब्बल 10 लाख लोक बरे होऊन घरी गेले आहेत. विशेष म्हण एका महिन्यात तब्बल 5 लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्याच्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ही १० लाख १६ हजार ४५० इतकी झाली आहे. मागील 24 तासात २० हजार ४१९ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 23 हजार 644 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात सध्याच्या घडीला २ लाख ६९ हजार ११९ रुग्ण एक्टिव्ह आहेत. विशेष म्हणजे 25 ऑगस्ट ते 26 सप्टेंबर या महिन्यात 5 लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे.
महाराष्ट्रातील करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ७६.९४ इतके झाले आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. मागील २४ तासांमध्ये ४३० मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यू दर हा २.६६ टक्के इतका झाला आहे.
आजवर ६३ लाख ७६ हजार ६७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३ लाख २१ हजार १७६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्याच्या घडीला राज्यात १९ लाख ४५ हजार ७५८ लोक होम क्वारंटाइन आहेत. तर ३० हजार ५७१ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.
आज नोंद झालेल्या एकूण ४३० मृत्यूंपैकी २२७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ९३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत अशी माहितीही आरोग्य विभागाने दिली.