आतापर्यंत एकूण ५,७११ लोकांचा मृत्यू : ३.८२ टक्के मृत्यूदर
मुंबई : ईगल आय मीडिया
राज्यात गेल्या २४ तासांत ९५१८ रुग्णांचे निदान झाले असून, एका दिवसात एवढय़ा रुग्णांचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे.राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिवसभरात आढळून आलेल्या करोना बाधित रुग्णांची आकडेवारी ट्विट केली आहे.एकाच दिवसात पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरांमध्येच अडीच हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत.मुंबईत गेल्या २४ तासात १ हजार ४६ कॊरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ६४ जणांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईतील एकूण रुग्णांचा आकडा १,०१,२२४ इतका असून, आतापर्यंत एकूण ५,७११ लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत २३ हजार ८२८ रुग्ण उपचार घेत आहेत
दिवसभरात २५८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असली तरी राज्याचा मृत्यूदर हा ३.८२ टक्के इतका कमी आहे.
राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून पहिल्यांदाच दिवसभरात इतक्या मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्णांची संख्या ३,१०,४५५ इतकी झाली आहे. तर मुंबईत बाधित रुग्णांची संख्या मोठी आहे. दिवसभरात मुंबईत करोनामुळे ६४ जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिवसभरात आढळून आलेल्या करोना बाधित रुग्णांची आकडेवारी ट्विट केली असून राज्यात आज ९,५१८ करोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण संख्या आता ३,१०,४५५ इतकी झाली आहे. आज ३,९०६ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत एकूण १,६९,५६९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १,२८,७३० इतकी आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.