Tiktok स्टार ग्लोरियाने यादगार बनवला ‘व्हॅलेंटाईन डे’

टीम : ईगल आय मीडिया
14 फेब्रुवारी हा दिवस जगभरात व्हॅलेंटाईन डे अर्थात प्रेमिकांचा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीविषयी विविध मार्गाने प्रेम व्यक्त केले जाते. कुणी त्या व्यक्तीसोबत डेटिंग ला जातं तर कोणी सहवासात दिवस घालवतं. बरेच जण आपापल्या कुवतीनुसार आपल्या प्रिय व्यक्तीला भेट वस्तू देत.
मेक्सिको मधील tiktok स्टार ग्लोरिया ने मात्र आपल्या नवऱ्याला जे गिफ्ट दिलं आहे, त्याची चर्चा जगभर सुरू आहे. स्वतः ग्लोरियाने या भेटवस्तूचा फोटो tiktok आणि यू ट्यूब वर share केला असून त्यावर प्रतिक्रिया आणि like चा पाऊस पडतो आहे.
ग्लोरियाच्या नवऱ्याने त्याच्या इन्स्टाग्राम वर ज्या – ज्या बायकांना like केले आहे, त्यांचे फोटो ग्लोरियाने इन्स्टाग्राम वरून डाउनलोड केले. त्यांच्या प्रिंट काढून ते फोटो नवऱ्याला व्हॅलेंटाईन गिफ्ट म्हणून दिले. सोबत तिने ही भेट नवऱ्याला ‘नक्कीच’ आवडेल असाही विश्वास ग्लोरियाने व्यक्त केला आहे.
या संदर्भात तिने एक 18 सेकंदाचा व्हीडिओ केला असून अल्पावधीतच तो 50 लाख लोकांनी पाहिला आहे. सोशल मीडियावर आपले नवरे काय काय नखरे करतात यावर लक्ष ठेवण्याची सूचक कृती ग्लोरियाने यानिमित्ताने केली आहे.
ग्लोरियाच्या या अनोख्या गिफ्टची जगभरात चर्चा सुरू असून यंदाचा व्हॅलेंटाईन डे तिच्या नवऱ्यासाठीच नाही तर जगभरातील सोशल ऍक्टिव्हिस्ट नवऱ्यासाठी ही ‘ यादगार ‘ ठरला आहे.