अपघात टाळण्यासाठी ट्रॅक्टर चालकाने लढवली शक्कल !

पंढरपूर : ईगल आय मीडिया

ऊस वाहतूक करताना ट्रॅक्टर आणि ट्रेलर मुळे अपघात होऊ नये यासाठी एका ट्रॅक्टर चालकाने चक्क ट्रेलर ला led बल्ब लावून सजवले आहे. रात्रीच्या अंधारात जाताना ट्रॅक्टर झगमगीत चमकत असून त्यामुळे अपघात टळणार आहे. या ट्रॅक्टर मालकाचे आणि चालकाचे कौतुक होत आहे.

व्हीडिओ पहा आणि चॅनेल subscribe करा

मुंढेवाडी ( ता.पंढरपूर ) येथील ट्रॅक्टर चालकाने फक्त 1 हजार रुपये खर्च करून ट्रेलर ला चारही बाजूने led बल्ब बसवले आहेत. हे बल्ब रात्रीच्या अंधारात झगमगीत चमकत आहेत. त्यामुळे खूप दूरवरून ट्रॅक्टर दिसून येतो आहे. यामुळे अपघात होणार नाहीत, सर्व ट्रॅक्टर मालक आणि चालकांनी अशा प्रकारे ट्रेलर आणि ट्रॅक्टरला लेड बसवून घ्यावेत असेही आवाहन चालक नितीन कौलगे याने केले आहे.

पंढरपूर तालुक्यातील सर्वच साखर कारखाण्याचे गाळप सुरू झाले असून नेहमीप्रमाणेच ट्रॅक्टर 2 ट्रेलर भरून ऊस वाहतूक करीत आहेत. ट्रॅक्टर आणि ट्रेलर मुळे आजवर तालुक्यात अनेक अपघात झालेले आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर बंद पडून रस्त्यावर, कडेला उभा करावा लागतो तेव्हा अंदाज न आल्याने अनेक अपघात झाले आहेत.

त्यामुळे ट्रॅक्टरमुळे मोठ्या2प्रमाणात अपघात होत असतात. हे लक्षात घेऊन परिवहन विभागाने ट्रॅक्टर ट्रेलर ना रेडियम लावण्याचे सक्तीचे केले आहे, तरीही त्याची अंमलबजावणी झालेली दिसून येत नाही.

Leave a Reply

error: Content is protected !!