आणि फडनविसांवर ट्विटर कर भडकले

सचिन तेंडुलकर च्या समर्थनार्थ केलेल्या ट्वीटवर नेटकरी संतापले

टीम : ईगल आय मीडिया

शेतकरी आंदोलनाकडे दुर्लक्ष केलेल्या आणि सरकारच्या समर्थनासाठी ट्विट केलेल्या सचिन तेंडुलकर वर नेटकरी नाराज आहेत. त्याचाच फटका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही बसला असून फडणवीसांनी सचिन तेंडुलकर च्या समर्थनासाठी ट्विट केल्यानंतर फडनविसांवर ट्विटर वर भडकले आणि त्यांनी फडणवीस यांच्या विरोधात हजारांहून अधिक रिट्विट्स केले आहेत.

शेतकरी आंदोलनावरून आंतरराष्ट्रीय पातळीवर आवाज उठल्यानंतर भारतातील सेलेब्रिटी जागे झाले. आणि हे आंदोलन देशांतर्गत विषय असून बाहेर च्या लोकांनी बोलू नये अशा अर्थाचे ट्विट्स सुरू केले. त्यावर देशातील सर्व सामान्यांपासून नेटकरी सुद्धा या सेलेब्रिटी विरोधात व्यक्त होऊ लागले. काल पर्यंत फॅन म्हणून ज्यांना फालो केले त्यांच्यावर टीकेची झोड उठली.

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हा भारतीयांच्या गळ्यातील ताईत मानला जातो. मात्र त्याच्यावरही सर्व स्तरातून मोठी टीका झाली. केरळमध्ये केरळ काँग्रेसच्या वतीने सचिन च्या प्रतिमेस काळे ऑइल फासून धिंड काढण्यात आली. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून केरळ काँग्रेसवर टीकाही केली, तसेच महाविकास आघाडी च्या नेत्यांना उद्देशून भारताचे भूषण, मराठी अस्मिता असलेल्या व्यक्तीच्या बाजूने ठाकरे बोलणार की नाही अशा अर्थाचे ट्विट केले.

त्यावर संतप्त झालेल्या ट्विटरकरांनी फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करणारे रिट्विट्स केले. त्याच बरोबर सचिन तेंडुलकर यालाही सोडले नाही. 1 हजारपेक्षा अधिक लोकांनी रिट्विट्स करीत फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!