‘शोधक’ कविता संग्रह तरुणाईचे प्रतिनिधित्व : आ. बबनदादा शिंदे

गणेश आटकळे यांच्या शोधक या कवितासंग्रहाचे प्रकाशन

फोटो
शोधक या कविता संग्रहाचे प्रकाशन करताना आ. बबनदादा शिंदे, कवी गणेश अटकळे, राज डुबल आदी

पंढरपूर : ईगल आय न्युज
शेगाव दुमाला ( ता. पंढरपूर ) येथील सॉफ्टवेअर अभियंता आणि युवा कवी गणेश अटकळे यांच्या शोधक या कविता संग्रहाचे प्रकाशन आ. बबनदादा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ग्रीनटीन आय.टी. सोल्युशन या सॉफ्टवेअर कंपनीचे संस्थापक राज डुबल, अजनसोंड जि प शाळेचे मुख्याध्यापक गणेश खडतरे, अजनसोंडचे सरपंच अजिंक्य घाडगे-पाटील, बापूसाहेब डुबल, लेखक व कवी गणेश आटकळे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. बबनदादा शिंदे यांनी शोधक या संग्रहातील कवितांचे कौतुक केले. तरुणच नवीन स्वप्ने पाहत असतात आणि त्या स्वप्नांच्या शोधासाठी प्रयत्नही तरुणच करू शकतात. त्यामुळे गणेश अटकळे यांच्या शोधक कविता या तरुणाईचे प्रतिनिधित्व करतात, प्रत्येक तरुणांनी अशा प्रकारची नव साहित्य निर्मिती केलं पाहिजे आणि सातत्याने वाचले पाहिजे, असेही आ. शिंदे यावेळी म्हणाले.

One thought on “‘शोधक’ कविता संग्रह तरुणाईचे प्रतिनिधित्व : आ. बबनदादा शिंदे

Leave a Reply

error: Content is protected !!