कुस्तीच्या अंतिम फेरीत पराभव ; बबिता फोगाटच्या ‘बहिणी’ची आत्महत्या

भरतपूर येथील राज्यस्तरीय सब ज्युनियर कुस्ती स्पर्धेत भाग घेतला होता.

टीम : ईगल आय मीडिया

कुस्तीचा अंतिम सामना हरल्यानंतर भारतीय महिला कुस्तीपटू रितिकाने आत्महत्या केलीय. रितिका ही बबिता फोगाट, गीता फोगाटची मामेबहीण होती. सोमवारी रात्री बलाली गावात तिने गळफास लावून आत्महत्या केली. रितिकाने 12 ते 14 मार्चदरम्यान राजस्थानमधील भरतपूर येथील राज्यस्तरीय कनिष्ठ महिला आणि पुरुष कुस्ती स्पर्धेत भाग घेतला होता.

अंतिम सामना 14 मार्च रोजी खेळविण्यात आला होता, त्यामध्ये रितिका एका सामन्यात पराभूत झाली. या पराभवानंतर तिला हादरा बसला आणि 15 मार्च रोजी रात्री 11 च्या सुमारास बलाली गावच्या घरात पंख्याला स्कार्फ लावून आत्महत्या केली.

राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील जैतपूर गावात राहणारी 17 वर्षीय रितिका पैलवान महावीर फोगाट या कुस्ती अ‍ॅकॅडमीमध्ये जवळपास 5 वर्षांपासून सराव करत होती. 53 किलो वजनी गटात राज्य पातळीवरील स्पर्धेत एका पॉईंटने झालेल्या पराभवाने रितिकाला मानसिक धक्का बसला, त्यामुळेच तिने हे धोकादायक पाऊल उचलल्याची चर्चा आहे. यापूर्वी तिने सुमारे 4 वेळा राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेतला होता.

रितिकालाही गीता आणि बबिताप्रमाणेच आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू व्हायचे होते. यासाठी ती पैलवान महावीर फोगाट अकादमीमध्ये 5 वर्षांपासून प्रशिक्षण घेत होती. यापूर्वीही तिने अनेक सामने खेळले होते. पण तिने हा सामना गमावला आणि पूर्णतः नैराश्येच्या गर्तेत अडकली आणि तिने आपले जीवन संपवले. 

Leave a Reply

error: Content is protected !!