मागील महिन्यात झाली होती कोरोना ची लागण
टीम : ईगल आय मीडिया
भारताचे माजी क्रिकेटपटू आणि माजी खासदार, उत्तर प्रदेशातील मंत्री चेतन चौहान यांचं आज निधन झालं. ते ७३ वर्षांचे होते. चेतन चौहान यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागणीही झाली होती. त्यानंतर त्यांच्या किडन्या निकामी झाल्यामुळे त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, शुक्रवारी त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. परंतु आज हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. चेतन चौहान यांचे बंधू पुष्पेंद्र चौहान यांनी ही माहिती दिली.
उत्तर प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यरत असलेल्या चौहान यांना जुलैमध्ये करोनाची लागण झाली होती. यानंतर उपचारासाठी ते लखनऊ येखील एका रुग्णालयात दाखल झाले.