चेतेश्वर पुजारा @ ‘6000’ धावा ;

१८ शतकं आणि २७ अर्धशतकं ही झळकावली

टीम : ईगल आय मीडिया

सिडनी येथे सुरू असलेल्या कसोटीत कारकिर्दीत 80 वा सामना खेळत असलेल्या चेतेश्वर पुजाराने 6 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. पुजारानं १३४ व्या डावांत ४८ च्या सरासरीनं हा टप्पा ओलांडला असून यादरम्यान पुजारानं १८ शतकं आणि २७ अर्धशतकं झळकावली आहेत. २०६ ही पुजाराची सर्वोच्च धावसंख्या आहे.

बॉर्डर-गावसकर मालिकेतील सिडनी कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजारानं कसोटी सामन्यात सहा हजार धावांचा पल्ला पार केला आहे. सहा हजार धावा पूर्ण कराना पुजारा भारताला ११ वा फलंदाज ठरला आहे. तिसऱ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी नॅथन लायनच्या चेंडूवर एक धाव घेत पुजारानं सहा हजार धावा पूर्ण केल्या आहेत. सिडनी कसोटी सामन्यात पुजारानं निर्णायक क्षणी ७७ धावांची खेळी केली.

चेतेश्वर पुजाराशिवाय सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सुनील गावसकर, लक्ष्मण, विरेंद्र सेहवाग, विराट कोहली, सौरव गांगुली, दिलीप वेंगसकर, मोहम्मद अजहरुद्दीन आणि गुंडप्पा विश्वनाथ यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 6 हजार धावांचा टप्पा पार केला आहे.


१० वर्षांपूर्वी बंगळुरुमध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात पुजारानं कसोटी सामन्यात पदार्पण केलं होतं. त्यानंतर १८ व्या डावात पुजारानं एक हजार धावांचा टप्पा पार केला होता. २००० धावांसाठी पुजाराला ४६ डाव लागले होते. तर ३००० धावांसाठी ६७ डाव, ४००० धावांसाठी ८४ डाव, ५००० धावांसाठी १०८ डाव आणि सहा हजार धावांसाठी १३४ डाव लागले आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!