चेन्नई कसोटीवर इंग्लंड चे वर्चस्व
टीम : ईगल आय मीडिया
कर्णधार जो रुटच्या द्विशतकाला बेन स्टोक आणि सिब्ली यांच्या अर्धशतकाची मिळालेल्या साथीमुळे इंग्लंडनं चेन्नई येथील पिहिल्या कसोटी सामन्यात ५७८ धावांचा डोंगर उभा केला आहे. दरम्यान, भारताची सुरुवात अडखळत झाली असून दोन्ही सलामीवीर तंबूत परतले आहेत.
चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये पहिली कसोटी खेळण्यात येत आहे. टीम इंडियाची पहिल्या डावातील सुरुवात निराशाजनक राहिली. टीम इंडियाचे दोन्ही ओपनर तंबूत परतले आहेत. रोहित शर्मा आणि शुबमन गिलला जोफ्रा आर्चरने आऊट केलं. टीम इंडियाने लंचपर्यंत 2 विकेट्स गमावून 59 धावा केल्या आहेत. कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा मैदानात खेळत आहेत. टीम इंडिया अजूनही 519 धावांनी पिछाडीवर आहे.
कर्णधार जो रुट यानं संयमी फलंदाजी करत २१८ धावांची खेळी करत इंग्लंडला मोठी धावसंख्या उभारण्यात मोलाची भूमिका साधली. इंग्लंड संघानं पहिल्या डावात १९० षटकांत ५७८ धावांचा डोंगर उभा केला. रुटशिवाय बेन स्टोक्स (८२) आणि सिब्ली (८७) यांनी अर्धशतकी खेळी केली. दिवसाच्या सुरुवातीलाच बुमराहनं आणि अश्विन यानं इंग्लंड संघाचे उर्वरित दोन गडी बाद करत ५७८ धावांवर इंग्लंडला रोखलं.
भारताकडून जसप्रीत बुमराह आणि आर. अश्विन यांनी प्रत्येकी ३-३ बळी घेतले. तर इशांत शर्मा आणि शाबाज नदीम यांना प्रत्येकी २-२ बळी मिळाले. चेन्नई कसोटीच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडनं ८ बाद ५५५ धावांवरुन खेळण्यास सुरुवात केली. तिसऱ्या दिवशी इंग्लंड संघानं २३ धावांची भर घातली.
दरम्यान, जो रूट आणि बेन स्टोक्स यांनी दुसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरूवात केली. पहिल्या सत्रात या दोघांनी ९२ धावांची भर घातली. त्यानंतर दुसऱ्या सत्रात स्टोक्सने अर्धशतक तर स्टोक्सने दीडशतक ठोकलं. बेन स्टोक्स फटकेबाजी करत असताना झेलबाद झाला. त्याने १० चौकार आणि ३ षटकार खेचले. रूटने मात्र लय कायम राखत द्विशतक झळकावले. तो २१८ धावांवर बाद झाला. त्यानंतर पोप (३४), बटलर (३०) हे झटपट बाद झाले. नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.