चेन्नई सुपर किंग्ज देणार 1 कोटी रुपयांचे बक्षीस

8758 क्रमांकाची विशेष जर्सी तयार करणार

टीम : ईगल आय मीडिया

इंडियन प्रीमियर लीगच्या चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) फ्रँचायझीने शनिवारी ऑलिम्पिक मध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राला 1 कोटी रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर केले आहे. त्याचबरोबर csk फ्रँचायझीने त्याच्या सन्मानार्थ 8758 क्रमांकाची एक विशेष जर्सी तयार करण्याची ही घोषणा केली आहे.

संबंधित बातमी वाचा

पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत नीरज ने 87.58 मीटर लांब थ्रो करून सुवर्णपदक जिंकले होते. या सुवर्णवेधी थ्रोने संपूर्ण देशाला स्फूर्ती दिली आहे. त्या थ्रो ची आठवण म्हणून सीएसके नीरज चोप्राच्या सन्मानार्थ 8758 क्रमांकासह एक विशेष जर्सी तयार करणार असल्याचे ही csk ने जाहीर केले आहे.

टोकियो ऑलिंम्पिक च्या शेवटच्या दिवशी नीरज चोप्रानेे भारतासाठी एथलेटिक्समध्ये पहिले सुवर्णपदक मिळवले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची मोहीम पूूूूर्ण झाली आहे. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल कौतुक आणि सन्मान म्हणून, CSK रु. 1 कोटी ते नीरज चोप्रा यास देण्याची घोषणा केली आहे.


भारतीय म्हणून आम्हाला नीरज चोप्राचा अभिमान वाटतो, कारण टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्याने केलेले प्रयत्न लाखो भारतीयांना खेळामध्ये सहभाग घेण्यास प्रेरित करतील आणि खेळातील कोणत्याही विषयात उच्च स्तरावर स्पर्धा करण्यास, सक्षम होण्यासाठी त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!