बेस्ट ‘फिनिशर’ ची कारकीर्द ‘फिनिश’

महेंद्रसिंह धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

टीम : ईगल आय मीडिया

जगातील सर्वोत्तम फिनिशर, भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी यानं आज स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. भारतीय क्रिकेट ला नवी उंची मिळवून देणारा आणि टीम इंडियाचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार म्हणून धोनीचे स्थान अढळ आहे.

गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या. 20 – 20, कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट मध्ये भारताला अजिंक्य बनवणारा धोनी एकमेव कर्णधार आहे. त्याचा हेलिकॉप्टर शॉट असो किंवा त्याने अनेकदा हातातून गेली अशी वाटणारी जिंकलेली मॅच असो धोनीचा खेळ क्रिकेटरसिक कधीही विसरु शकणार नाहीत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द

  • कसोटी सामने – 90 सामने , 4 हजार 876 रन्स, 38.09 सरासरी, 6 शतके आणि 33 अर्धशतके, सर्वाधिक धावा 224
  • एकदिवसीय सामने – 341, 10 हजार 500 रन्स, 50.72 रन्स सरासरी, 10 शतके, 71 अर्ध शतके, 183 सर्वाधिक रन्स,
    * ट्वेन्टी-ट्वेन्टी – 98 सामने, 1617 रन्स, 37.60 सरासरी, 2 अर्ध शतके, 56 रन्स सर्वाधिक स्कोअर

२०१९ विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर तत्कालीन निवड समितीने धोनीला नंतर संघात स्थान दिलं नाही. तेव्हाच विश्वचषकानंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करणार होता अशी चर्चा होती. परंतु आज 15 ऑगस्ट रोजी त्याने आपली आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द फिनिश केली.

One thought on “बेस्ट ‘फिनिशर’ ची कारकीर्द ‘फिनिश’

Leave a Reply

error: Content is protected !!