Icc च्या कसोटी रँकिंगमध्ये भारताचे अव्वल स्थान कायम

अष्टपैलू टॉप 5 मध्ये 2 भारतीय खेळाडू

टीम : ईगल आय मीडिया

ICCने जाहीर केलेल्या नव्या यादीत कसोटी क्रिकेट संघाच्या रँकिंगमध्ये भारताने पहिले स्थान कायम राखले असून अष्टपैलूंमध्ये टॉप 5 मध्ये भारताच्या 2 खेळाडूंनी आपली जागा कायम राखली आहे. तर पाकिस्तान विरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील कामगिरीच्या जोरावर इंग्लंडच्या तीन खेळाडूंनी top 10 मध्ये जागा मिळवली आहे.
Icc ने नुकतीच क्रिकेटच्या विविध प्रकारची रँकिंग जाहीर केली त्यात भारतीयांनी आपले स्थान अबाधित राखले आहे.
इंग्लंडने पहिल्या कसोटीत पाकिस्तानला ३ गडी राखून चौथ्या दिवशीच पराभूत केले. इंग्लंडच्या विजयामुळे त्यांच्या खेळाडूंना कसोटी क्रमवारीत बढती मिळाली.


बेन स्टोक्स अव्वलस्थानी कायम आहे. ख्रिस वोक्सने २ स्थानांची बढती घेत ७ वे स्थान पटकावले आहे. तर स्टुअर्ट ब्रॉड एका स्थानाच्या बढतीसह १०व्या क्रमांकावर आहे. भारताचे रविंद्र जाडेजा (३) आणि रवीचंद्रन अश्विन (५) टॉप ५ मधील स्थान राखून आहेत.

icc ने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट रँकिंगमध्ये भारतीय संघ 360 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे तर ऑस्ट्रेलिया 296 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. या यादीत 266 गुणांसह इंग्लंड संघ 3 ऱ्या नंबरवर आहे.

गोलंदाजांच्या यादीत पहिल्या ९ स्थानांत कोणताही बदल झालेला नाही. दहाव्या स्थानी पाकिस्तानचा मोहम्मद अब्बास संयुक्तपणे आहे. फलंदाजांच्या यादीत बेन स्टोक्स तिसऱ्या क्रमांकावरून ७व्या क्रमांकावर गेला आहे. तर केन विल्यमसन आणि डेव्हिड वॉर्नर यांना बढती मिळाली असून ते अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहेत.

कसोटी अंजिक्यपद स्पर्धेत पाक विरूद्धच्या विजयानंतर २६६ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. तर पाकिस्तान अजून १४० गुणांसह पाचव्या स्थानी आहे. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या खात्यात २९६ गुण आहेत. त्यामुळे पाकिस्तान विरूद्धची मालिका जिंकून ऑस्ट्रेलियाच्या पुढे जाण्याची इंग्लंडला संधी आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!