जर्मनीवर 5 विरुद्ध 4 गोल ने केली मात
टीम : ईगल आय मीडिया
भारताला जर्मनीविरुद्धची लढत जिंकून कांस्यपदकासह 41 वर्षांचा हॉकीतील पदकाचा दुष्काळ संपवला असून भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. भारतीय संघाने जर्मनीचा पराभव करत कांस्यपदक मिळवलं आहे. तब्बल ४१ वर्षांनंतर भारतीय संघाला हॉकीमध्ये पदक मिळालं आहे. अत्यंत चुरशीच्या अशा लढतीत भारतीय संघाने जर्मनीचा ५-४ ने पराभव केला.
सुरुवातीला पराभवाच्या छायेत असणाऱ्या भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन केलं. भारताचा हा विजय हॉकीच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिला जाईल असाच आहे. उपांत्य फेरीमधील निराशाजनक पराभव मागे टाकून ४१ वर्षांचा ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवण्याचा पराक्रम भारतीय पुरुष संघाने केला आहे.
1980 पूर्वी सलग आठ ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकणाऱ्या भारताने १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये अखेरचे पदक जिंकले होते. परंतु त्यानंतर भारताला एकही पदक मिळवता आले नाही. चालू असलेल्या रिओ ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या जर्मनीला टक्कर देत भारताने पदकाचे स्वप्न ४१ वर्षांनंतर साकारले.
असा रंगला भारत – जर्मनी हॉकी सामना
सामन्यातील शेवटचे सहा सेकंद शिल्लक होते तेव्हा जर्मनीला पेनल्टी कॉर्नर मिळाला. ही जर्मनीची शेवटची संधी होती. पंचांनी शिट्टी वाजवताच जर्मनीने गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय गोलपोस्टजवळ भिंत बनून उभ्या असणाऱ्या गोलपकीपर श्रीजेशने हा प्रयत्न हाणून पाडला आणि भारतीय खेळाडूंनी मैदानात एकच जल्लोष केला.
पेनलटीची संधी गमावली 2 व्या मिनिटाला रुपिंदरचा शॉट जर्मन खेळाडूच्या पायाला लागला आणि भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला पण भारतीय संघ त्याचं गोलमध्ये रुपांतर करू शकला नाही. भारताला सलग दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि यावेळीही भारताला यश मिळाले नाही.
भारत 5-3 ने आघाडीवर
टीम इंडियाचं हॉकीमध्ये जर्मनीवर वर्चस्व असलेलं पाहायला मिळालं. भारताने 0-2 अशा पिछाडीनंतर 5-3 अशी आघाडी घेतली आणि ती शेवटपर्यंत टिकवली. भारताने तिसऱ्या क्वार्टरमध्ये दोन गोल केले आहेत. भारताने 31 व्या मिनिटाला चौथा गोल केला. रुपिंदर पाल सिंगने पेनल्टी स्ट्रोकचे गोलमध्ये रुपांतर केले. यानंतर सिमरनजीत सिंगने 34 व्या मिनिटाला गोल केला. या गोलसह भारताने जर्मनीवर 2 गोलची आघाडी घेतली. पहिला पूर्वार्ध संपला तेव्हा दुसऱ्या क्वार्टरमध्ये जर्मनीकडून सलग दोन गोल केल्यानंतरही भारतीय संघ दबावाखाली आला नाही आणि दोन पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर केल्यामुळे भारताने 3-3 अशी बरोबरी साधली.
26 व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला, हरमनप्रीत सिंगचा ड्रॅग-फ्लिक जर्मन गोलरक्षकाने रोखलं पण हार्दिक सिंगने पुन्हा रिबाउंडवर गोल केला. यानंतर, संघाला 28 व्या मिनिटाला पुन्हा पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि यावेळी हरमनप्रीत सिंगच्या ड्रॅग फ्लिकने भारताला 3-3 ची बरोबरी करुन दिली.
सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला जर्मनीचा पहिला गोल !
मनदीप सिंगला भारतीय संघासाठी पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. रुपिंदर सिंगने ड्रॅग फ्लिकच्या साथीने कॉर्नरला गोलमध्ये रुपांतरित करण्याचा प्रयत्न केला पण बॉल गोलच्या वरुन निघून गेला. भारतीय संघ दुसऱ्या मिनिटाला मागे पडला. जर्मनीच्या तैमूर ओराजने जर्मनीसाठी पहिला गोल करत संघाला सामन्यात 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. भारतीय संघाच्या डिफेन्समध्ये चूक झाली
भारताने दूसरे क्वार्टरच्या शुरुवातीलाच गोल केला. सिमरनजीतला सर्कलच्या आतच बॉल मिळाला. त्याने बॉलला टर्न करत गोल केला आणि भारतीय संघाला जर्मनीशी बरोबरी करुन दिली. 15 व्या मिनिटाला श्रीजेश समोर येऊन जर्मन खेळाडूला रोखण्याचा प्रयत्न करत होता पण जर्मनीला पेनल्टी कॉर्नर देण्यात आला. एक एक करून जर्मनीला 4 पेनल्टी कॉर्नर देण्यात आले. मात्र, भारताने त्यांना 2-0 अशी आघाडी करण्याची संधी दिली नाही