जर्मन अ‍ॅथलिट म्हणाला होता, नीरज माझ्या जवळपास ही पोहोचणार नाही !

तिसऱ्या फेकी नंतर तोच ठरला अपात्र : नीरज ने मारले मैदान

टीम : ईगल आय मीडिया


ज्या माजी विश्व विजेत्या जर्मन खेळाडूने भारतीय भालाफेक खेळाडू नीरज चोप्राला किरकोळीत काढल होतं, आणि तो माझ्या जवळपास ही पोहोचणार नाही, अशी दरपोक्ती केली होती. तो जर्मन खेळाडू जोहान्स व्हेटर तिसऱ्या थ्रो नंतर अपात्र ठरला आणि त्याच्या नाकावर टिच्चून नीरज ने सुवर्णपदकाचा जल्लोष साजरा केला.

संबंधित बातमी वाचा !

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण वेध घेणारा भाला फेकणाऱ्या नीरज चोप्राने इतिहास रचला आहे. त्याने पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी नोंदवून सुवर्णपदक जिंकले आहे. अंतिम फेरीत नीरजने चक्क 87.58 मीटर लांबचा थ्रो केला.

स्पर्धेआधी भालाफेकमध्ये प्रबळ दावेदार असलेल्या वेट्टरला पत्रकारांनी विचारले होते की भारताच्या नीरज चोप्राबद्दल काय वाटतं ? तेव्हा वेट्टर म्हणाला होता की, ‘नीरजचं हे पहिलंच ऑलिम्पिक आहे. त्याला अजून खूप काही शिकायचं आहे. मला तो आव्हान देऊ शकणार नाही. माझ्यापर्यंत पोहोचायला त्याला अजून खूप मेहनत करावी लागेल. सध्या मला चिंता नाही. त्याचं काही आव्हान नाही.’

आजच्या स्पर्धेत ही कामगिरी सर्वोत्कृष्ट होती, त्यामुळे स्पर्धेतील अन्य कोणताही खेळाडू त्याच्या जवळपास फिरू शकत नव्हता. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी जर्मनीचा माजी विश्वविजेता जोहान्स व्हेटरने नीरजला आव्हान दिले होते.

जोहान्स व्हेटर कोण आहे ?

90 मीटरपेक्षा जास्त अंतरावर भाला फेकणारा जोहानस वेट्टर हा जगातील एकमेव खेळाडू आहे. त्याने असा पराक्रम 18 वेळा केला आहे. गेल्या वर्षी विश्वविक्रम करण्यापासून तो 72 सेंटीमीटर दूर राहिला होता. पोलंडच्या सिलेसियामध्ये त्याने 97.76 मीटर अंतर कापले होते. झेक प्रजासत्ताकचा जान जेलेजनी याने 98.48 मीटर भाला फेकत विश्वविक्रम केला आहे, 

नीरज ने आजच्या कामगिरीने त्याला केवळ मागेच सोडले नाही, तर आपल्या नावावर सुवर्ण जिंकले. जर्मन खेळाडू बॉटम -3 मध्ये असल्यामुळे 3 फेऱ्यांनंतर अपात्र ठरला. यानंतर नीरजने संपूर्ण देशाला उत्सव साजरा करण्याची संधी दिली आहे. हे भारतासाठी आतापर्यंतचे सर्वात यशस्वी ऑलिम्पिक ठरले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!