बी सी सी आय ने मागितली परवानगी
टीम : ईगल आय मीडिया
आयपीएलचा तेरावा हंगाम संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळवला जाणार आहे. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी क्रीडा वृत्त वाहिनीशी बोलत असताना हि माहिती दिली. गव्हर्निंग काऊन्सिलच्या आगामी बैठकीत याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात येईल असहि पटेल म्हणाले. स्पर्धेच्या तारखां त्यांनी यावेळी जाहीर केल्या नसल्या तरीही २६ सप्टेंबर ते ७ नोव्हेंबर या काळात बीसीसीआय स्पर्धेचं आयोजन करण्याच्या तयारीत आहे.
यावेळी अधिक माहिती देताना पटेल म्हणाले कि, “आयसीसी टी-२० विश्वचषकाचं आयोजन पुढे ढकलन्याबद्दल आयसीसीने घोषणा केल्यानंतर आम्ही भारत सरकारकडे स्पर्धा भरवण्याची परवानगी मागितली आहे आणि ती मिळेल अशी आशा आहे”, पटेल यांनी माहिती दिली. दुबई, अबुधाबी आणि शारजाह या तीन मैदानांवर ही स्पर्धा खेळवली जाईल. या स्पर्धेला चाहत्यांना परवानगी असेल की नाही याबद्दल निर्णय UAE मधील सरकारचा असल्याचं पटेल यांनी सांगितलं. ७ नोव्हेंबरला स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार असल्याचहि सांगितले जाते.
सोमवारी संध्याकाळी आयसीसीने टी-२० विश्वचषकाचं आयोजन पुढे ढकलल्याची अधिकृत घोषणा केली. स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान होन्याची शक्यता आहे, ते टाळण्यासाठी वर्षाअखेरीस स्पर्धेचं आयोजन करता यावं यासाठी बीसीसीआय मोर्चेबांधणी करत आहे. यापूर्वी २०१४ साली आयपीएलचे काही सामने युएईमध्ये भरवण्यात आले होते.