हॉस्पिटलमध्ये दाखल : प्रकृती स्थिर असल्याची माहिती
टीम : ईगल आय मीडिया
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि विक्रमी बळी घेणारा वेगवान गोलंदाज कपिल देव याना हृदय विकाराचा झटका आला आहे. फोर्तीस हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जाते.
१९८३ साली भारतीय संघाला पहिल्यांदा विश्वचषक मिळवून देणारे माजी कर्णधार कपिल देव यांना गुरुवारी रात्री उशीरा हृदयविकाराचा झटका आला आहे. पहाटे 1 वाजता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. कपिल देव यांच्यावर सध्या दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे समजते.
कसोटी कारकिर्दीत ५ हजार २४८ धावा आणि ४३४ बळी, वन-डे क्रिकेटमध्ये ३ हजार ७८३ धावा आणि २५३ बळी अशी बहारदार कामगिरी कपिल देव यांनी आपल्या कारकिर्दीत केली. १९८३ च्या विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात कपिल देव यांनी नाबाद १७५ धावा करत भारताला अशक्यप्राय विजय मिळवून दिला होता
६१ वर्षीय कपिल देव अनेकदा क्रिकेट सामन्यांमध्ये समालोचनही करत असतात. आपल्या १६ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत कपिल देव यांनी १३१ कसोटी आणि २२५ वन-डे सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. आपल्या काळातले सर्वोत्तम अष्टपैलू म्हणून ओळख असलेल्या कपिल देव यांचा भारतीय संघाला विश्वचषक जिंकवून देण्यात मोठा उचलला होता.