भारताच्या नीरज ने पटकावले सुवर्णपदक

भारताची टोकियो ऑलिम्पिकमध्ये विक्रमी कामगिरी

टीम : ईगल आय मीडिया

टोकियो ऑलिम्पिकमध्ये अखेर भारताच्या नावे सुवर्णपदक जमा झवले असून भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज इतिहास रचत सुवर्णपदकाला गवसणी घातली.आज दुपारी कुस्तीमध्ये बजरंग पुनियाने ब्राँझपदक मिळवून भारताच्या 6 व्या पडकावर शिक्कामोर्तब केले होते.आणि संध्याकाळी नीरज चोप्रा ने भाला फेक मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा भारतासाठी विक्रमी पदक मिळवून देणारी स्पर्धा ठरली आहे.

भारताचा नीरज चोप्रा हा भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात दाखल झाला होता आणि त्याच्याकडून आज सुवर्णपदकाची अपेक्षा होती. नीरजने पहिल्याच फेरीत ८७.०३ मी एवढ्या लांब भाला फेकला आणि तो आता पदक पटकावणार, असे सर्वांनाच वाटत होते. दुसऱ्या फेरीत तर नीरजने ८७.५८ मीटर भाला फेकला आणि जवळपास पदक निश्चित केले होते. तिसऱ्या फेरीत नीरजने ७६.७९ मीटर भाला फेकला होता, पण दुसऱ्या फेरीतील त्याची कामगिरी सर्वोत्तम होती. त्यामुळे त्याची ती फेक सुवर्णपदक विजेती ठरली आहे.

यापूर्वी झालेल्या स्पर्धेत नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 86.65 मीटर थ्रोसह अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे त्याच्याकडून यावेळी मोठ्या अपेक्षा होत्या. भारताला १३ वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये हे सुवर्णपदक मिळाले आहे, यापूर्वी नेमबाजपटू अभिनंव बिंद्राने भारताला पहिले सुवर्णपददक जिंकवून दिले होते.

Leave a Reply

error: Content is protected !!