नंबर वन टेनिसपटू नोवाक जोकोव्हिक कोरोना बाधित

पत्नीलाही झाली लागण : मुले मात्र निगेटिव्ह


टीम : ईगल आय मीडिया
क्रीडा जगतासाठी धक्कादायक बातमी आहे कि सुप्रसिद्ध टेनिसपटू नोवाक जोकोव्हिक याला कोरोना ची लागण झाली आहे. विशेष म्हणजे सहकुटूंब बेलेग्राड इथे गेलेल्या नोवाकच्या पत्नीलाही कोरोना पॉजिटीव्ह असून मुले मात्र यातून बचावली आहेत.
सर्बियाचा ३३ वर्षीय नोवाक जोकोव्हिक सध्या टेनिस च्या जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. नोल ह्या टोपणनावाने ओळखला जाणाऱ्या नोव्हाकने २००८, २०११, २०१२, २०१३, २०१५, २०१६ व २०१९ साली ऑस्ट्रेलियन ओपन, २०११, २०१४ व २०१५ साली विंबल्डन व २०११ व २०१५ साली यू.एस. ग्रँडस्लॅम ह्या दहा टेनिस स्पर्धा जिंकल्या आहेत. कोणतीही ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकणारा तो सर्बियाचा प्रथम टेनिसपटू आहे.
मंगळवारी नोवाक आणि त्याची पत्नी पॉजिटीव्ह असल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे क्रीडा जगतात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!