सिताराम महाराज प्रशालेमध्ये संस्थांतर्गत कबड्डी क्रीडा स्पर्धा संपन्न.

फोटो
कबड्डी स्पर्धेत सहभागी सीताराम महाराज विद्यालयाचा संघ आणि शिक्षक 


 प्रतिनिधी : पंढरपूर

 खर्डी ( ता.  पंढरपूर ) येथील, श्री सिताराम महाराज विद्यालय येथे “सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष  देशभक्त कै. संभाजीराव तथा दादासाहेब शेंडे यांच्या 26 व्या स्मृतिदिनानिमित्त कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन चेअरमन  मुकुंद परिचारक यांनी केले. तर प्रमुख पाहुणे म्हणून सिताराम साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक सौ.राजलक्ष्मी गायकवाड होत्या.

 या कबड्डी स्पर्धेसाठी मेडशिंगी, उदनवाडी, गणेशवाडी ,लवंगी, सिद्धेवाडी, कोर्टी, लोटेवाडी या शाखेतील कबड्डीचे 14 वर्ष व 17 वर्ष  वयोगटातील मुला – मुलींचे 29 संघ आले होते यावेळी संस्थेचे संचालक जयंत डोंगरे, विकास जाधव, विजय इंगवले, प्रकाश शिंदे, उपस्थित होते. खर्डीच्या सरपंच सौ.मनीषाताई सव्वाशे, उपसरपंच  शरदभाऊ रोंगे, ग्रामपंचायत सदस्य श्री.नारायण रोंगे, सिताराम रोंगे,मोहन रोंगे  उपस्थित होते.

स्पर्धेसाठी पंच म्हणून, पांडुरंग कुंभार,सचिन हजारे,पंचाक्षरी स्वामी, शिवाजी भोसले, कुंडलिक जाधव, संतोष मोरे, प्रकाश जाधव, धनाजी जाधव,अतुल साले, यांनी काम पाहिले.

 मुख्याध्यापक  सचिन कुलकर्णी, पर्यवेक्षक चंद्रकांत रोंगे, आनंदा रोंगे, एम.एस.गायकवाड, आण्णा घाडगे, कांबळे, सचिन शिंदे, सुरवसे,ढेरे,बाबर, मुकुंद काळेबाग, गुलाब मस्के,दादा मोरे, विक्रम शिंदे, दत्ता माळी. पोरे,  तसेच, क्रिडा मार्गदर्शक कल्पना मोरे, बबिता बाबर,सुवर्णा जाधव,  पोरे,नवले,लोहार, व  सुनिल घाडगे, सचिन घाडगे,नरुटे, मुकुंद नवले यांनी केले. यांच्यासह सर्व शाखांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी, उपस्थित होते. प्रास्ताविक भारत पाटील  यांनी केले तर  कार्यक्रमाचे, सूत्रसंचालन प्रदीप वाघमारे व महादेव भोसले यांनी केले.आभार आप्पासाहेब रोंगे यांनी मानले.

Leave a Reply

error: Content is protected !!