सोलापूर : ईगल आय मीडिया
हॉकिपटू मेजर ध्यानचंद यांचा 29 ऑगस्ट हा जन्मदिवस राष्ट्रीय क्रिडा दिवस म्हणून साजरा केला जातो. या राष्ट्रीय क्रीडा दिवसानिमित्ताने महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने क्रिडा मार्गदर्शक आणि क्रिडा पत्रकार यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापालिका क्रिडाधिकारी नजीर शेख, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापिठातील क्रिडा सन्मवयक प्रा सुरेश पवार, कार्यक्रमाचे आयोजक तथा महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत बाबर यांची उपस्थिती होती.
क्रिडा क्षेत्रात भरीव काम करुन देशाचे नाव उज्वल करण्यासाठी सर्वांनी पुढाकारा घेण्याची आवश्यकता आहे असे मत प्रमुख मान्यवरांनी व्यक्त केले.
क्रिडा मार्गदर्षक प्रा. किरण चौगुले, प्रा. आनंद चव्हाण, प्रा. शरण वांगी, प्रा. राहुल हजारे, पोलीस कर्मचारी व राष्ट्रीय खेळाडू अतुल गवळी तसेच क्रिडा
पत्रकार अजित संगवे, विरेश अंगडी, नितीन ठाकरे, बसवराज मठपती, रणजित वाघमारे, अमोल सिताफळे आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला.
संयोजक प्रशांत बाबर यांनी प्रास्ताविकात कार्यक्रम घेण्यामागची भूमिका राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त खेळांडूना मार्गदर्शन करून घडवणारे मार्गदर्शक व खेळाडूंना प्रोहत्साहन देणारे पत्रकार यांचा आदर सत्कार करणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजून या कार्यक्रमाचे आयोजन केले असे स्पष्ट केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश कुलकर्णी, विशाल झळके, संदिप कुसेकर, ओंकार जगताप, आकाश अंबीपूर आदींनी परिश्रम घेतले.
क्रिडा क्षेत्रात कार्यरत राहण्याची घेतली शपथ..
मेजर ध्यानचंद यांना स्मरण करुन भारताचे नाव क्रिडा क्षेत्रात उंचावेल यासाठी आम्ही कार्यरत राहू अशी शपथ यावेळी घेण्यात आली.