राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत द्वितीय क्रमांक विजेत्या प्रतीक्षा येलपले हीचा सत्कार करताना अजित कंडरे आणि इतर
पंढरपूर : eagle eye news
शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी (पुणे) येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धत येलमार – मंगेवाडी (ता.सांगोला) येथील प्रतीक्षा दत्तात्रय येलपले हिने गोळाफेक मध्ये राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्याबद्दल तिचा सोलापूर सोशल फाउंडेशन च्या वतीने अजित कंडरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, यावेळी माजी सरपंच प्रकाश सोळसे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना शालेय जीवनात जिद्द,चिकाटी,आणि अथक परिश्रम घेणे आवश्यक आहे, यश हे अपघाताने मिळत नसते तर त्यासाठी खुप मेहनतीने काम करावे लागते आहे,विद्यार्थ्यांनी इतर आमिषाला बळी न पडता आपले ध्येय साध्य करण्यासाठी परिश्रम घेतले पाहिजे असे मत यावेळी सोलापूर सोशल फाउंडेशन चे अजित कंडरे यांनी मत व्यक्त केले.
यावेळी गोळाफेक स्पर्धेत तालुकास्तरावर दुसरी आलेली पल्लवी येलपले हिचा सत्कार गणेश पाटील यांनी केला. यावेळी प्राचार्य अनिल येलपले, दत्तात्रय येलपले, क्रीडा शिक्षक चेतन धनवडे, नितीन घाडगे, सरपंच बापू जावीर, माजी सरपंच दत्ता मासाळ, संजय चौगुले, गणेश पाटील सह पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.