पंढरपूर तालुकास्तरीय शालेय खोखो स्पर्धेत 19 वर्षाखालील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक
पंढरपूर : eagle eye news
सोलापूर जिल्हा व पंढरपूर तालुक क्रीडा कार्यालय व आदर्श प्रशाला शेवते यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंढरपूर तालुकास्तरीय शालेय खोखो स्पर्धेत 19 वर्षाखालील मुलींच्या गटात वसंतराव काळे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय वाडीकुरोली च्या संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केला.
मुलींच्या अंतिम सामन्यात वसंतराव काळे प्रशालेच्या संघाने पटवर्धन कुरोली प्रशाला या संघाचा एक डाव आठ गुणांनी पराभव केला. जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी या संघाची निवड झाली असून पंढरपूर तालुक्याचे जिल्हास्तरीय फोकस स्पर्धेत हा संघ प्रतिनिधित्व करणार आहे.
आपल्या विजयी यशाची परंपरा शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये कायम ठेवली असून संघाची कर्णधार साक्षी देठे अष्टपैलू खेळाडू स्नेहा लामकाने, कल्याणी लामकाने, समृद्धी सुरवसे, वैष्णवी काळे, श्रावणी कस्तुरे,श्रुती कस्तुरे, पल्लवी बोराडे, समृद्धी जगताप, आयेशा शेख, ऋतुजा पासले, श्रावणी देठे यांनी अष्टपैलू खेळ करत संघाला विजय मिळवून दिला या संघाला प्रशिक्षक अतुल जाधव सहकारी समाधान काळे यांचे मार्गदर्शन मिळाले.
सर्व यशस्वी खेळाडू व प्रशिक्षक मार्गदर्शकाचे श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कल्याणराव काळे सचिव बाळासाहेब काळे गुरुजी प्राचार्य एस. आर.कुलकर्णी पर्यवेक्षक एस.एम. शेख तालुका क्रिडा मार्गदर्शक मोहन यादव, चेतन धनवडे प्रशालेतील मैदान सर्व शिक्षक बंधू-भगिनी व पालक यांनी अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.