पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत निवड
पंढरपूर : ईगल आय न्यूज
स्वेरीच्या रोहन पांडुरंग पवार याने ऑल इंडिया स्पोर्ट्स फेडरेशन’ तर्फे आयोजित कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. यामुळे आता त्याला पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत प्रवेश मिळणार असून रोहन पवार याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
रहाटेवाडी (ता.मंगळवेढा) येथील रोहन पांडुरंग पवार यांनी दहावीनंतर स्वेरीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक) मध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागात शिकत आहे. वाखरी येथे दि. ३ ऑगस्ट रोजी झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्यामुळे त्याची इंदापूरच्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत निवड झाली होती.
या स्पर्धेत १७ वर्षे वयोगटातील कुस्ती स्पर्धेमध्ये देखील गोल्ड मेडल मिळाले. त्यामुळे आता आंध्रप्रदेशात होणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याला प्रवेश मिळणार आहे.’ अशी माहिती प्राचार्य डॉ. एन.डी.मिसाळ यांनी दिली.
रोहनचे प्रशिक्षक किरण देठे व रोहन पवार यांचा डॉ.बी.पी. रोंगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी रोहनच्या मातोश्री सौ.वनिता, वडील पांडुरंग पवार आणि मामा बाळासाहेब बाबर, प्रा. अजिंक्य देशमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.
स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी रोहनचे अभिनंदन केले.
अभिनंदन मित्रा 💐💐