मोफत वेबसाईटवर चित्रपट, वेब सिरीज पाहणे टाळा

मुंबई : ईगल आय मीडिया
सध्याच्या काळात बरेच नागरिक इंटरनेटचा वापर मोफतमध्ये ऑनलाईनवर विविध प्रकारचे चित्रपट,वेब सिरीज पाहण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी करतात. सायबर भामटे त्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता असल्याने त्यापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे.
सध्याच्या काळात इंटरनेटचा वापर करण्याऱ्या व्यक्तींची संख्या वाढत आहे . या मधील सायबर भामटे लोकांच्या याच सवयीचा फायदा घेत आहेत . जेव्हा एखादी व्यक्ती अशा फ्री वेबसाईटवर क्लिक करते तेव्हा त्या वापरकर्त्याच्या नकळत एखादे malware डाउनलोड होते व ते तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलमधील सर्व माहिती सायबर भामट्यानां पाठवते त्याचा उपयोग हे भामटे एक तर अशा नागरिकांना त्रास देऊन खंडणी मागण्यासाठी करत असतात किंवा अन्य आर्थिक गुन्हा करण्यासाठी त्याचा वापर करू शकतात.
वेबसाईट व त्यावरील चित्रपट सूची, सोबतच्या छ्याचित्रात दिसत आहे
अशा काही वेबसाईट व त्यावरील चित्रपट यांची सूची खालील प्रमाणे दिली आहे .
महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते कृपया अशा मोफत वेबसाईटवर चित्रपट किंवा वेब सिरीज पाहणे शक्यतो टाळा . जर तुम्ही अशी एखादा चित्रपट किंवा वेब सिरीज डाउनलोड केली असेल व ती तुम्हाला प्ले करायच्या आधी काही permission मागत असेल तर अशी permission देऊ नका आणि ती फाईल delete करा . शक्यतो अधिकृत व खात्रीलायक वेबसाईटवरूनच चित्रपट किंवा वा वेब सिरीज पहा. त्याला काही शुल्क असेल तर ते भरा . तुमच्या मोबाईल व कॉम्प्युटर मध्ये latest antivirus सॉफ्टवेअर install करा.
केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी जे नियम व आदेश प्रसिद्ध करतील त्याचे पालन करा व गरज नसल्यास कृपया घराच्या बाहेर पडू नका.
असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!