1 लाख 8 हजार जागांसाठी होणार प्रक्रिया
पुणे : सदाशिव पोरे
महाराष्ट्र राज्य तंञशिक्षण मंडळाच्या वतीने दहावी व बारावी ऊत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सोमवार दि. १० आॕगस्ट पासून सुरुवात होणार आहे. शासकीय १७७५९ , अशासकीय अनुदानित ३८९० तर विनाअनुदानित ८६३९२ अशा एकूण १०८०४१ जागांसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेव्दारा प्रवेश दिला जातो. यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कागदपत्रे पडताळणीसाठी ई-स्कूटनी व प्रत्यक्ष स्कूटनी पद्धतीने अर्ज भरता येणार आहे. त्यासाठी ३३६ सुविधा केंद्राची निवड करण्यात आली असुन सर्व प्रक्रिया नि:शुल्क असेल. राखीव जागेतुन अर्ज भरण्यासाठी ३०० रु तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ४०० रुपये अर्जाची फी असेल.
आॕनलाईन नोंदणी व कागदपत्रे पडताळणी १० आॕगस्ट ते २५ आॕगस्ट पर्यंत चालु राहील. या कालावधीत ई-स्कूटनी व प्रत्यक्ष स्कूटनी असे दोन पर्याय विद्यार्थ्यांसमोर असतील. याबाबतची सविस्तर माहिती मंडळाच्या संकेतस्थळावर ऊपलब्ध केली आहे. २८ आॕगस्टला गुणवत्ता यादी प्रदर्शित केली जाईल. अर्जामधील तक्रार निवारणासाठी २९ ते ३१ आॕगस्ट हे दिवस राखीव असतील. अंतिम गुणवत्ता यादी २ सप्टेंबरला मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. वेळोवेळी प्रवेश प्रक्रियाबद्दल अधिकृत माहिती संकेतस्थळावर जाहीर होत राहील असं प्रसिद्धीपञकाद्वारे मंडळाकडुन जाहीर करण्यात आले आहे.