पंढरपूर मध्येच आता आय टी क्षेत्रात जॉब ची संधी

ग्रीनटीन आय.टी. सोल्युशन्स सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीची संधी

प्रतिनिधी : पंढरपूर
आय टी क्षेत्र आणि त्यातील लाखांचे आकर्षक पॅकेज म्हटले कि पुणे, बेंगलोर, हेंद्राबाद चे नाव घेतले जाते. मात्र आता आयटीयन्स ना पंढरपूर मध्येही जॉब ची संधी मिळणार आहे. पंढरपूरच्या युवकांनी स्थापन केलेल्ल्या आय टी कंपनीत जॉब भरती निघाली असून इच्छुकांना चांगली संधी चालून आलेली आहे.

पंढरपूरमध्ये नुकत्याच काही महिन्यांपूर्वी ग्रीनटीन आय.टी. सोल्युशन्स सॉफ्टवेअर कंपनीची स्थापना झाली आहे. या कंपनीचे जगभरात अनेक ग्राहक आहेत. खरे तर सॉफ्टवेअर डेव्हलप्मेंटसारखा व्यवसाय पंढरपूरमध्ये सुरु होणे, हे इथल्या सिंहगड, स्वेरी, कर्मयोगी अशा अनेक इंजिनिरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे आहे. कारण त्यांना नोकरी करण्यासाठी पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी न जाता इथंच कंप्युटर इंजिनीअर म्हणून नोकरी मिळू शकते.

पंढरपूरमध्ये ग्रीनटीन आय.टी. सोल्युशन्सचा व्यवसाय सुरु होण्यापूर्वी २०१६ पासून ही कंपनी पुण्यातून आपले जगातील अनेक ‘ग्राहक कंपन्यां’साठी काम करत आहे. याबरोबरच आता ती रोबोटिक आणि ग्राहक-व्यवस्थापनाच्या (CRM)सॉफ्टवेअरवर काम करत आहे. तरी रविवार २७ नोव्हेंबर आणि ४ डिसेंबर सकाळी १० वाजल्यापासून नवीन जागा भरतीसाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत त्यासाठी ME/MTech/ BE/ BTech/MCA/BCA या पदवीची शैक्षणिक पात्रता असेल असेही राज डुबल यांनी सांगितले.

याबरोबरच आता ग्रीनटीन आय.टी. सोल्युशन्सचे संस्थापक राज डुबल यांनी कंपनीसाठी १५ इंजिनिरिंगच्या जागा भरण्याची गरज असल्याची घोषणा केली आहे. याबरोबर त्यांनी असेही सांगितले की, ग्रीनटीन आय.टी. सोल्युशन्स रोबोटिक, मोबाईल एप व इतर बँकिंग आणि इंशुरंस संबधित सॉफ्टवेअर बनवण्याचे काम करत आहे. त्यामुळे १५-२० कंप्युटर इंजिनीअर्सची गरज वाढली आहे.

मुलाखतीची वेळ
: रविवार २७ नोव्हेंबर, ४ डिसेंबर सकाळी १० वाजता.
शैक्षणिक पात्रता : ME/MTech/ BE/ BTech/MCA/BCA
स्थळ : आय.टी. सोल्युशन्स, कंडरे रेसिडन्सी, इसबावी पंढरपूर.

Leave a Reply

error: Content is protected !!