सौरचुलीच्या प्रमाणीकरणा च्या विविध औष्णीक पध्दती
सध्याच्या ऊर्जासक्षमीकरणाच्या काळात नुतन, ऊर्जास्त्रोत अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडत आहेत. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “उज्ज्वला” या योजनेव्दारे स्वच्छ चुलीचे महत्व ओळखून त्यांच्या प्रसारासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. भारतासारख्या सौरऊर्जा संपन्न देशात सौरऊर्जेच्या अनेक उपकरणांपैकी सौरचुली हे एक महत्वाचे साधन असुन, दैनंदिन जीवनात ऊर्जाबचतीसाठी त्यांचा प्रभावी वापर करता येतो. तसेच, सौरचुलींवर शिजविलेल्या अन्नाचे अनेक औषधी फायदे आहेत. या सर्व कारणांमुळे, पारंपारिक ऊर्जास्त्रोतांवर (उदा. लाकुड, कोळसा, केरोसिन, एल. पी. जी.) चालणा-या चुलींच्या तुलनेत सौरचुली या स्वच्छ चुली म्हणुन ओळखल्या जातात. श्री. अतुल सागडे, प्रा. समदर्शी व त्यांचे सहकारी यांनी सौरचुलींसाठी सौरचुल प्रकाश-औष्णीक गुण्णोत्तर निंदेशांक ( Cooker Opto-Thermal Ratio {COR}) या मापदंडाचे संशोधन केले. तसेच या मापदंडाच्या सहाय सौरचुलींच्या प्रमाणीकरणासाठी विविध नाविन्यपूर्ण औष्णीक पध्दती (थर्मल मेथडस्) विकसित केल्या आहेत. १) यामध्ये बाँक्स टाईप सौरचुलींचे एकग्रता प्रमाणाचे (कान्संट्रेशन
रेशोचे) अचुकतेने मापन व प्रमाणीकरण करणे, २) सौरचुलींचा वापर उच्च तापमानावर अन्न शिजविण्याच्या प्रक्रियांमध्ये (उदा. तळणे, भाजणे ) कसा करता येतो व त्याचे अचुकतेने मापन व त्यानुसार प्रमाणीकरण करणे, ३) सूर्यप्रकाशीय शीतलीकरण ( Open Sun Cooling Test) या नाविन्यपूर्ण औष्णीक पध्दतीने सौरचुलींचा वापर थोडया वेळाकरीता अपु-या किंवा अचानक कमी जास्त होणा-या सूर्यप्रकाशातही कसा शक्य आहे व त्यांची ऊर्जासक्षमता अधिक अचुकतेने मोजता व वाढविता येणे शक्य आहे हे दाखवून दिले आहे.
तसेच ४) सौरचुलीसाठी आधुनिक/सुधारित कुकींग पॉटस अर्थात अन्न शिजविण्याची भांडी, या सर्व संशोधनामुळे
विविध प्रकारच्या वातावरणामध्ये कार्यरत राहणा-या नविन सौरचुलींची संरचना करणे अधिक सोपे होणार आहे.
सौरचुलीवरील या संशोधनांची दखल सोलर एनर्जी; रिन्युएबल एनर्जी व इतर अनेक आंतरराष्ट्रीय ऊर्जा विषयक संशोधन नियतकालीकांनी घेत त्यावरील विविध शोधनिबंध
प्रसिध्द केले आहेत.
भारतासारख्या खंडप्राय देशात सौरचुलींचा वापर वर्षातील आठ महिन्यांपेक्षा जास्त काळ करणे
शक्य आहे. परंतु, अनेक कारणास्तव या सौरचुलीचा वापर सर्वसामान्य गृहिणी व लोकांद्वारे त्यांच्या दैनंदिन
स्वयंपाकासाठी केला जात नाही, हा धागा लक्षात घेऊन सौरचुलींच्या प्रसारासाठी व सक्षम वापराकरीता
अधिक संशोधनाची गरज अधोरेखित होते. तसेच, या संशोधनाव्दारे तयार होणा-या सौरचुली या
स्थानिक स्तरावर लोकांच्या गरजेनुसार बनविता येणार असून, भविष्यात स्थानिक रोजगार उपलब्ध
होण्यास मदतच होईल. या पार्श्वभूमीवर आधुनिक सौरचुलींची संरचना व त्यांची ऊर्जासक्षमता या
संदर्भात अधिकाधिक संशोधन करुन सौरचुलीं सर्वसामान्य लोकंपर्यंत पोहचविण्याचा निर्धार आवश्यक
आहे.
लेखकाबद्दल थोडक्यात,
लेखक डॉ. अतुल सागडे सौर औष्णिक ऊर्जा अभियांत्रिकी या विषयातील संशोधक असून त्यांचे या विषयातील पंचवीस पेक्षा अधिक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिके व पत्रिका तसेच परीषदांमध्ये प्रसिध्द झाले आहेत.
डॉ.सागडे यांना आंतरराष्ट्रीय ऊर्जा आयोग यांचेकडून सन २०११ मध्ये सौर औष्णिक व शीतकरण ऊर्ज अभियंत्रिकी / तंत्रज्ञान याविषयावरील सन २०१२ ते सन २०५० पर्यतची पथदर्शी पत्रिका तयार करण्यासाठी जर्मनी, चीन व ऑस्ट्रेलिया येथे आयोजित आंतरराष्ट्रीय कार्यशाळेमध्ये सौर ऊर्जा तज्ञ म्हणून निमंत्रित केले होते. तसेच त्यांनी सौर औष्णिक ऊर्जा, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान यावरोबरच स्वच्छ व नुतनीकरणक्षम ऊर्जा स्त्रोत यासारख्या विषयावरील संशोधनासाठी संशोधन प्रयोगशाळा पंढपूर येथे विकसीत केली आहे.
डॉ.अतुल सागडे