अनुराधा पौडवाल यांना पुत्रवियोग

आदित्य पौडवाल याचे निधन

टीम : ईगल आय मीडिया

सुप्रसिद्ध हिंदी,मराठी गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवाल याचे निधन झालं. आदित्य ३५ वर्षांचा होता.

गेल्या काही महिन्यांपासून तो आजारी होता. मूत्रपिंड निकामी झाल्यानं त्याचं निधन झाल्याचं कळतंय. आदित्य हा अरुण व अनुराधा यांचा मुलगा होता. शनिवारी पहाटे त्याने अखेरचा श्वास घेतला. म्युझिक अरेंजर, निर्माता अशी आदित्यची संगीतविश्वात ओळख होती.

Leave a Reply

error: Content is protected !!