पंढरपूर तालुक्यातील 47जणांचे अहवाल आले निगेटिव्ह

           पंढरपूर : ईगल आय मिडिया

 पंढरपूर तालुक्यातील  कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 47  व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

             पंढरपूरात  रेडझोन मधून आलेल्या नागरिकांना  बुधवारी कोरोनाची  लागण झाल्याचे  आढळून  आल्यानंतर  त्यांच्या संपर्कातील  पंढरपूर, गोपाळपूर, उपरी आणि चळे येथील 47 जणांचे स्वॅब तपासणीसाठी  पाठविण्यात आले होते.  संपर्कातील सर्वच  व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.  या संपर्कातील व्यक्तीनाही संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले होते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये  यासाठी प्रशासनाकडून तात्काळ उपाययोजना करण्यात आल्या असल्याचेही प्रांतधिकारी ढोले यांनी यावेळी सांगितले

            तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी  पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, महसूल प्रशासन, नगरपालिका प्रशासन तसेच स्वयंसेवी संस्था आहोरात्र झटत आहे. तालुक्यात बाहेरुन  आलेल्या नागरीकांचे संस्थात्मक विलगीकरण  बंधनकारक करण्यात आले आहे.  या नागरीकांनी स्वत:च्या आणि इतरांच्या आरोग्यासाठी जबाबदारीने  रहावे. सर्वच नागरीकांनी आपल्या 65 वर्षावरील व्यक्ती आणि 10 वर्षाखालील मुलांची काळजी घ्यावी. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे सर्वांनी पालन करावे असे आवाहनही प्रांताधिकारी ढोले यांनी यावेळी केले आहे. 

Leave a Reply

error: Content is protected !!