पंढरपूर तालुक्यात रोजगार हमी योजनेतून 61 कामे सुरु

           पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर तालुक्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजूरांना  हक्काचा रोजगार  मिळण्यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून तालुक्यात 61 कामे सुरु आहेत.  या कामांवर 309 मजुर काम करीत असल्याची माहिती तहसिलदार वैशाली वाघमारे यांनी दिली.

           लॉकडाऊनच्या काळात परराज्यातून तसेच परजिल्ह्यातून स्वगृही परतलेल्या मजुरांनाही महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतंर्गत रोजगाराची संधी उपलब्ध  झाली आहे. जास्तीतजास्त मजुरांच्या हाताला कामा देण्यासाठी राज्यशासनाने जास्त रोहयोची कामे सुरु करावीत असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.  त्या अनुषंगाने रोजगाराची कामे सुरु झाली असुन, तालुक्यात 28 गावांमध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून सिंचन विहिरीची 22 कामे, घरकुलांची 15 कामे तर रेशीमची 24 असे एकूण 61 कामे सुरु असल्याची माहिती तहसिलदार वाघमारे यांनी दिली. 

             कामावरील मजुरांची नोंदणी करुन खात्यातच मजुरीची रक्कम जमा होत असल्याने त्यांना आर्थिक हातभार लागत आहे.  मजुरांच्या मागणी प्रमाणे मजुरांना  तात्काळ कामे उपलब्ध करुन देण्याची दक्षता घेण्यात येत असून,  कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी कामावर आरोग्य विभागाच्या सुचनेनुसार काटेकोर पालन करण्यात येत असल्याचेही तहसिलदार वाघमारे यांनी सांगितले.

Leave a Reply

error: Content is protected !!