पुणे : ईगल आय मीडिया
पुणे येथील रास्ता पेठेतील एका रुग्णालयात २ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला असून बाळास कोरोना पॉजिटीव्ह होता. ७ जून रोजी बाळाचा मृत्यू होऊनही रुग्णालयाने महापालिकेकडे याची नोंद न केल्यामुळे यामागचे कारण काय आहे याबाबत गूढ वाढले आहे .
३ जुन रोजी रस्ता पेठेतील एका रुग्णालयात २ महिन्याच्या बाळास उपचारार्थ दाखल करन्यात आले होते. या बाळास कोरोना पॉजिटीव्ह असल्याचा अहवाल आलेला होता आणि ७ जून रोजी बाळाचा मृत्यू झाला होता . घटना घडून १ आठवडा उलटला तरीही महापालिकेच्या आरोग्य विभागास संबंधित रुग्णालयाने माहिती दिली नाही . त्यामुळे हि माहिती न देण्यामागील कारण काय असा प्रश्न उपस्थित होत आहे .