प्रांताधिकाऱ्यांची कर्तव्य तत्परता : पटवर्धन कुरोलीत 2 तासात उभारले नवीन शौचालय

पंढरपूर : ईगल आय मीडिया
पटवर्धन कुरोली (ता. पंढरपूर) येथील जि प शाळेत विलगिकरण केलेल्या नागरिकांना आवश्यक सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी होत्या.
प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि अवघ्या 2 तासात नवीन शौचालय, स्नानगृहाची उभारणी केली. प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दाखविलेल्या या तप्तरतेमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
लॉकडाऊनच्या कालावधीत मुंबई, पुणेसारख्या शहरातून गावात येऊन विलगिकरण केलेल्या नागरिकांना आरोग्य, अन्न, पाणी, वीज, शौचालय आदी सुविधा देणे प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत, याची काळजी घेण्याच्या सुचना प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी स्थानिक प्रशासनाला दिल्या.
पटवर्धन कुरोली येथे जवळपास ३० नागरिक आले आहेत. त्यांना खबरदारी म्हणून गावालगतच्या झेडपी शाळेतील खोल्यांमध्ये विलगिकरण केले आहे. तेथे १४ दिवसांच्या कालावधीत त्या नागरिकांना शौचालय, पाणी, वीज, आरोग्य, जेवण, स्वच्छता आदी सुविधा देणे गरजेचे होते. मात्र स्थानिक क्वारंटाईन समिती, ग्रामपंचायत, महसूल प्रशासन या नागरिकांना आवश्यक सुविधा देताना चालढकल करत होते. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात होता. याबाबत तक्रारी येताच प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी रविवारी पटवर्धन कुरोली गावात भेट देऊन झेडपी शाळेत विलगीकरण कक्षाला भेट दिली आणि तेथील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.  त्यांनी विलगिकरण कक्षातील नागरिकांना त्यांच्या मागणीनुसार स्वच्छतागृह, स्वच्छ पाणी, वीज, जेवण आदी सुविधा देण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची आहे. त्या त्यांना देण्यात याव्यात, अशा सक्त सूचना दिल्या व त्याचे नियोजन ग्रामपंचायत, क्वारंटाईन समिती, महसूल प्रशासन यांनी करावे, असे सांगितले. यावेळी ग्रामपंचायत,  महसूल, क्वारंटाईन समितीचे अधिकारी उपस्थित होते.
सुविधा द्या अन्यथा महिलांची सोया घरी करा
पटवर्धन कुरोली येथील झेडपी शाळेत विलगिकरण केलेल्या नागरिकांमध्ये बहुतांश महिला, लहान मुले, वृद्धांचा समावेश आहे. मात्र महिलांसाठी त्या ठिकाणी शौचालय, स्नानगृह नसल्यामुळे आमची गैरसोय होत आहे, हे प्रांताधिकाºयांच्या लक्षात आणून देताच तेथे तत्काळ सुविधा द्या किंवा त्यांची दररोज घरी ने-आण करून स्वछतागृह व आंघोळीची सोय करावी, असे आदेश दिले. त्यामुळे चालढकल करणारे स्थानिक प्रशासन तत्परतेने कामाला लागले.
येथील क्वारांटाईन नागरिकांना वीज, पाणी, स्वच्छतागृह, स्नानगृह, पिण्याचे पाणी देताना टोलवाटोलवी सुरू होती. मात्र प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी स्वत: भेट देऊन आदेश दिले. त्यांच्या या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करत अवघ्या काही तासात नवीन स्वच्छतागृह, स्नानगृह, पिण्याच्या पाण्याची सोय केली. त्यामुळे नागरिक समाधानी आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!