मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मागणीचे निवेदन देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
मुंबई : ईगल आय मीडिया
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली आणि दोन दिवसांच्या कोकण दौर्यानंतर 19 मागण्यांचे एक निवेदन त्यांना सादर केले.
देवेंद्र फडणवीस यांनी गेले दोन दिवस कोकणाचा दौरा करून स्थानिकांशी संवाद साधला. अनेक ठिकाणांना भेटी देऊन नुकसानीचा प्रचंड आढावा घेतला. या पार्श्वभूमीवर त्यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीच्यावेळी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री आशीष शेलार, रवींद्र चव्हाण, निरंजन डावखरे, सुनील राणे आदी नेते उपस्थित होते.
हेक्टरी मदतीच्या निकषामध्ये बदल करण्यात यावा, मासेमारांसह शेतकर्यांना कर्जमाफी देण्यात यावी, मासेमारांना डिझेलचे परतावे तत्काळ देण्यात यावे, वीज नसल्याने बँकांचे व्यवहार ठप्प असल्याने तातडीची मदत रोखीने देण्यात यावी अशा विविध 19 मागण्या त्यांनी या निवेदनातून केल्या आहेत.