टीम : ईगल आय मीडिया
हिंदी – मराठी चित्रपट क्षेत्रातील नामवंत अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचे वडील तथा गोव्याचे माजी मंत्री अच्युतराव उसगावकर यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 88 वर्षांचे होते.
अच्युत उसगावकर यांनी गोवा मुक्ती स्वतंत्र संग्रामात सहभाग घेतला होता. गोवा स्वतंत्र झाल्यानंतर भाऊसाहेब बांदोडकर यांच्या मंत्रिमंडळात अच्युत उसगावकर हे मंत्री होते. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते असलेले अच्युतराव उसगावकर भाऊसाहेब बांदोडकर, त्यांच्या कन्या शशिकला काकोडकर यांच्याही मंत्रिमंडळात मंत्री होते.
मिरामार येथे ते राहत होते. गोव्याच्या विकासात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनानंतर गोव्यात शोक व्यक्त होत आहे.